शारदा विद्यालय धानोरा बु.मुख्याध्यापक पुंडलिक संतुका चिंतलवाड यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

उमरी तालुका प्रतिनिधी/ उध्दव मामडे 

उमरी:-शारदा विद्यालय धानोरा बु.येथील मुख्याध्यापक श्री.पुंडलिक संतुका चिंतलवाड यांचा सेवापूर्ती समारंभ दि.१ एप्रिल रोजी शारदा विद्यालय धानोरा बु. संस्थापक अध्यक्ष श्री गोविंदराव पाटील, संस्थापक सचिव श्री दत्तराव देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुवर्णाताई घडलींगराव कदम,सचिव सुधाकरराव देशमुख यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी दिंगाबर जगताप यांनी पुंडलिक संतुका चिंतलवाड यांच्या जिवन चारीत्र्यावर बोलतांना म्हणाले की, अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून चिंतलवाड सर यांनी अपार मेहनत, जिद्द ,चिकाटीच्या व कर्तुत्वाच्या बळावर मुख्याध्यापक पदापर्यंत पोहोचले. वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या बोळसा(बु) येथील एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कुटुंबातील अध्यात्मिक व नैतिक संस्कार लहानपणापासूनच त्यांच्यात रुजलेले होते.गोविंदराव पाटील करखेलीकर यांच्या सारख्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व अध्यात्मिक जाण असलेल्या व्यक्तीत्वाचा त्यांना परिसस्पर्श झाला. ते १९९३ रोजी करखेली शिक्षण संस्था, करखेली संचालित शारदा विद्यालय धानोरा (बु.) येथे रूजू झाले. त्यांची तडफ व धडपड बघता संस्थेने त्यांना सुरूवातीपासूनच मुख्याध्यापक पदावर रूजू केले .

 त्यांच्या आतापर्यंतच्या ह्या प्रवासात गोविंदराव पाटील करखेलीकर यांचे मार्गदर्शन व प्रेरणा पुंडलिक संतुका चिंतलवाड या मित्रांसोबत सोबत होती. म्हणून त्यांनी परिसरात शिक्षणासाठीचे लोकोपयोगी प्रयोग केले. तेथील परिसर शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध केले.सुरूवातीच्या काळात विद्यालयात जेमतेम पंचवीस विद्यार्थी होते.

सर घरोघरी जाऊन परिसरातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत. ग्रामीण भागातील पालक व विद्यार्थी यांच्यात शिक्षणाविषयी जनजागृती केली. त्यामुळे या विद्यालयात पंचवीस विद्यार्थी ते पाचशे विद्यार्थी असा पल्ला गाठला आहे.आज परिसरातील एक आदर्श विद्यालय म्हणून सर्वदूर ख्याती आहे.

 दिनांक 31 मार्च रोजी सोमवार 2025 रोजी मुख्याध्यापक या पदावरून 31 वर्ष 7 महिने प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. एवढा प्रदीर्घ कालावधी कोणत्याही मुख्याध्यापकांना मिळाला नसेल माझ्या मित्राला मिळालेला आहे आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं. त्यासाठी पुंडलिक संतुका चिंतलवाड यांचे सेवानिवृत्तीनंतर चे आयुष्य निरोगी व लोकोपयोगी होवो हीच सदिच्छा व्यक्त करतो.

सेवानिवृत्ती बद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या,यावेळी, उपसरपंच कैलासराव देशमुख धानोरकर, दत्तराम पाटील मुंगल,पत्रकार उद्धव मामडे, मुधोळकर सर,पुपुलवाड सर,ताटे सर, रेड्डी सर,देवकवाड सर, घंनसटवाड सर,डुबुकवाड सर,अनेराये सर, मोकळे दत्ता, ईटलोड गंगाधर मामडे, उत्तम पुपुलवाड,उत्तम पाटील बाचेगाव, शिपकर सर मुंडकर सर नारायण मुद्गगलवाड जाधव सर, पाटील सर कदम आरडी सूर्यवंशी सर पवळे सर लक्ष्मण गुंडावार डॉ .कैलास देशमुख अशोक सर्जे,पो.पा. राहुल पांचाळ वडगावे सर ज्योती चंदनवार दत्ता सलगरे दासरे सर सुशीला मॅडम पत्रकार यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मुख्याध्यापक शिक्षक वर्ग बहुसंख्य उपस्थित होते. प्रास्ताविक ताटे सर यांनी केले आहेत तर सुत्र संचालन मुधोळकर सर यांनी केला आहे.

आभार पुपुलवाड सर यांनी मानुन आलेल्या मान्यवरांच शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.अनेक विद्यार्थीनी भाषणे केली.

Share This Article
error: Content is protected !!