उमरी लग्न जमत नसल्याने विविहेच्छुक मुलांची चिंता वाढली!!

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नौकरी अभावी ग्रामीण भागातील चित्र;माता पिता ही हतबल..?

उमरी तालुका प्रतिनिधी उध्दव मामडे 

उमरी:मुलांचे लग्नाचे वय वाढत चालले आहे.अनेक “काणी प्रयत्न करूनही विवाह जुळत नाही. अनेक वधू-वर सूचक मेळावे पालथे घालून झाले. ग्रामदैवतास नवसही केले; मात्र,अजूनही लग्न जमत नसल्याने विवाहेच्छुक मुलांची चिंता वाढली आहे. आई-वडीलही हतबल झाले आहेत.अशा स्थितीत मुलांसाठी स्थळ पाहायला जाणारी मंडळी ‘तुम्ही फक्त मुलगी द्या,विवाहाचा जो काही खर्च आहे, तो आम्हीच

करतो’, असे म्हणत वधूपित्याला गळ घातली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नोकरीवाल्या मुलाचे जमते,मात्र उच्चशिक्षित असूनही काही कामधंद्याला लागला नाही,म्हणून सोयरीक जुळविताना अडचणी येत आहेत.सर्वांनाच नोकरी मिळेल असे नाही, तर खासगी कंपन्यांत काम चांगल्या पगारावर काम करणारा मुलगा देखील पसंत केला जातो.मात्र, दहा- पंधरा हजारांवर काम करणान्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना लग्नाकरिता मुलीच मिळत नाही. त्यातच वय वाढत लग्नाविना चालल्याने राहण्याची वेळ येते की काय,अशी भीती तरुणाईला वाटत आहे.

मुलींची घटती संख्या याला कारण आहे.वंशाचा दिवा हवा

म्हणून गर्भातच मुलींचा गळा घोटल्याचा हा परिणाम आहे.

मुलांमागे मुलींचे प्रमाण कमी

आहे.आता मात्र मुलाचे हात

पिवळे करण्यासाठी वडिलांची

दमछाक होत आहे.जिकडे- तिडके सध्या एक प्रश्न उपस्थित

होत आहे.आमचा मुलगा लग्नाचा

आहे,मुलगी आहे काय,लग्न

सोहळ्याचे बाकी सगळे आम्ही

करू,फक्त मुलीच्या वडिलांना

सांगा’,अशी अवस्था उपवर मुलाच्या वडिलांची झाली आहे.

अशा आहेत मुलाबाबत अपेक्षा-

नोकरी आणि शेतीपण पाहिजे,

मुलाला सरकारी नोकरी हवी,तो इंजिनिअर असावा,त्याचा शहरात फ्लॅट हवा,त्याला चांगले पॅकेज हवे, हे सर्व ठीक,पण तो एकुलता एकच असावा, लग्नानंतर त्याने शहरातच सेटल व्हावे,आमची मुलगी गावाकडे राहणार नाही, अशी अपेक्षा पालकांसह मुलींकडूनही व्यक्त केली जात आहे.मुलांचे वाढू लागलेय वय-आजमितीला प्रत्येक गावामध्ये वयाच्या बावीसाव्या वर्षापासून तेवयाच्या ३५ वर्षापर्यंतचे शेकडो तरुण आपले लग्न जमेल कधी,

या प्रतीक्षेत आहेत.अनेक मुलांचे वयही वाढत आहे.लग्न जमत नसल्याने अनेक तरुणांमध्ये नैराश्याची भावना वाढीस लागली आहेत.काही जण दारूच्या आहारीही जात आहेत. वधू-वर सूचक मेळाव्यात लग्नाळू युवक हजेरी लावून कंटाळून गेल्याची चर्चा आहे.

Share This Article
error: Content is protected !!