अन्न व नागरी पुरवठा विभाग तर्फे हिमायतनगर नगरपंचायत येथे 4 एप्रिल रोजी ई केवायसी शिबीराचे आयोजन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही.

हिमायतनगर ता.प्रतिनीधी/बाबाराव जरगेवाड

हिमायतनगरअन्न व पुरवठा विभाग व आरोग्य विभागाच्या वतीने शिधापत्रिका ई केवायसी व तसेच आयुष्यमान भारत कार्ड तयार करण्याकरिता दि.4 एप्रिल रोजी सकाळी 10:00ते 5:00 पर्यंत

 हिमायतनगर शहरातील नगरपंचायत येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, नागरिकांनी सोबत आधार कार्ड, शिधापत्रिका व मोबाईल सोबत आणावेत. सदरील उपक्रम हा मोफत असून कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नसून, या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून ekyc करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी केले आहे.

शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्याचा लाभ बंद झाल्यास लाभार्थी जबाबदार राहील तरीही पुढे धान्याचा लाभ सुरु ठेवणेकरिता ekyc करून घ्यावे असे आवाहन पुरवठा निरीक्षण अधिकारी धोटे मॅडम यांनी लोकतंत्र प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Share This Article
error: Content is protected !!