मांजरा नदी पात्रातून हजारो ब्रास अवैद्य रेतीचे उत्खनन रेती माफीयांचा शहर व परिसरात धुमाकूळ

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील बिलोली तालुक्या मधील कुडलवाडी शहारापासून अवघ्या 6 किमी अंतरावर असलेल्या मौजे हुनगुंदा, नागणी येथील मांजरा नदी पात्रातून दररोज रात्री अवैद्य रेतीचे उत्खनन होत असून याकडे महसूल व पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाल्यामुळे रेती माफियानी शहर व परिसरात धुमाकूल घातला असल्यामुळे पोलीस अधीक्षक यांच्या ऑपरेशन फ्लॅश आऊट या पथकाचा अक्षरशः फज्जा उडाला आहे.

तेलगंणा राज्याच्या सीमेवर वसलेले कुंडलवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेले मौजे हुनगुंदा,नागणी येथील मांजरा नदी पात्र हे लाल रेतीचे कोठार समजले जाते,या लाल रेतीला राज्यासह तेलंगाणा व कर्नाटक राज्यात मोठी मागणी असल्यामुळे या नदी पात्रातून आजतागायत दररोज मध्यरात्री किमान 40 हायवा व अनेक ट्रॅक्टरच्या माध्यमातून सर्रासपणे रेती माफिया रेतीची अवैद्य वाहतूक करून महसूल प्रशासनाचे महसूल बुडवत आहेत अशा गंभीर बाबीकडे महसूल व पोलीस प्रशासनाचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहे.

गेल्या काही महिन्यापासून जिल्हायात पोलीस अधीक्षक यांनी ऑपरेशन फ्लॅश आउटच्या माध्यमातून अवैद्य रेती माफियावर कडक कार्यवाही करण्यासाठी पथक नेमले या पथकाच्या माध्यमातून अनेक रेती माफियावर कडक कार्यवाही करण्यात आले,सदरील पथकात उपजिल्हाधिकारी,उपविभागीय पोलीस अधिकारी,प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक अवैद्य रेती माफियावर लगाम घालण्यासाठी केली असले तरी या पथकाला हुनगुंदा,नागणी येथील मांजरा नदी पात्रातून मध्यरात्री होत असलेले अवैद्य रेती उत्खनन रोखण्यास अपयश आल्यामुळे या पथकाचा अक्षरशः फज्जा उडाला आहे.

या पथकात असलेल्या स्थानिक महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाला रेती माफियाकडून दर महिना प्रमाणे हायवा व ट्रॅक्टरचे दर ठरवून आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे रेती माफियाकडून सर्रासपणे दबक्या आवाजात बोलले जात आहे.अशा गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालून अवैद्य रेती माफियावर कडक कारवाई करून रेती माफियाची होत असलेली दहशत संपुष्टात आणावी अशी मागणी जनता करीत आहेत.

Share This Article
error: Content is protected !!