गोल्ला गोलेवार समाजाची रनरागीनी कु.गिता राजेश चिकनेपवाड हीची बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी साहाय्यक पदी निवड.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

हिमायतनगर ता. प्रतिनिधी /बाबाराव जरगेवाड

हिमायतनगर – तालुक्यातील नावलौकिक असलेल्या अंदेगाव सारख्या छोटूशा गावातील गिता राजेश चिकनेपवाड हीची बृहन्मुंबई महानगरपालिकेत सरळ सेवेत अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यकारी साहाय्यक पदी निवड झाली आहे, सरळ सेवा अंतर्गत घेण्यात आलेल्या या पदासाठी एकुन १८४८ जागा उपलब्ध होत्या त्यापैकी भटक्या जमाती पैकी कूमारी गिता राजेश चिकनेपवाड हीची निवड झाली आहे.

कु.गिता चिकनेपवाड हिचे वडील हे आदेगांव सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हिमायतनगर व समाज संघटनेचे तालुका उपाध्यक्ष या पदावर विराजमान आहेत,आदेगाव खेड्यातील समाज हा स्त्री शिक्षणाचा अनादर करत आसतांना त्यांनी महात्मा फुले यांचे ब्रिद वाक्य स्त्रि शिक्षणाशिवाय आपल्या परीवाराचा उद्धार होणार नाही.हे वाक्य आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले व‌ आपल्या मुलीला शिक्षण देऊ केले, कुमारी गिता हिने आपल्या शिक्षणात कूठलीच कसर न ठेवता आलेल्या परीक्षेत मजल मारुन गरुडझेप घेत आपल्या आई वडिलांचे नावांचा ठेसा समाजात उमटविला आहे.

गिता हे मोठ्या घरातून असल्यामुळे प्राथमिक शिक्षण हे गावात झाले असून बालवयात शिक्षणाची आवड होती पुढे माध्यमिक व कॉलेज जीवनात अतिशय मेहनती सरळ सेवे अंतर्गत परीक्षेत उत्तीर्ण होऊन चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवत गोल्ला गोलेवार यादव समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

कु.गिता राजेश्वर चिकनेपवाड हिच्या यशाबद्दल गोल्ला गोलेवार यादव समाजाचे  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड साहेब भोशीकर व तालुक्यातील समाज बांधव सुभाषराव शिलेवाड, बाबाराव जरगेवाड,संजय काईतवाड,पर्वत काईतवाड श्याम जक्कलवाड, अभिषेक बकेवाड नारायण कोरेवाड यांनी शुभेच्छा दिले आहे व समाजातून गावातून मित्रपरिवारातून मोठ्या प्रमाणात भरभरून कौतुक होताना दिसून येत आहे.

Share This Article
error: Content is protected !!