नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे.
नायगाव – तालुक्यातील मौजे हुस्सा येथील डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यात अध्यक्षपदी संदीप भगवान गायकवाड यांची तर उपाध्यक्षपदी मारुती आनंद गायकवाड यांची तर सचिव उत्तम आनंदा गायकवाड, सहसचिव नामदेव गणपती भगतकर, कोषाध्यक्षपदी प्रकाश पांडुरंग गायकवाड, सदस्य दिगंबर भुजंगा धनकवाड, सदस्य गौतम गंगाजी गायकवाड , सदस्य महादेव गुलाब भगतकर यांची सर्वानुमते निवड दि.१० एप्रिल रोजी एका महत्वकांशी बैठकीत करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंतीचे आयोजन करण्यात आले असून सदर जयंती दि. २६/४/२०२५ रोजी
करण्याचे योजिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमाने साजरी करण्यात येत असून दरवर्षीप्रमाणे कार्यक्रमात लेझीम पथक बँड पथक सह मोठा गजर करण्यात येणार आहे. आणि या भव्य सोहळ्यामध्ये गावातील अनेक बालकांनी लेझीम पथकामध्ये भाग घेऊन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर भाषण देखील करण्यात येणार आहे. गावातील चिमुकल्या बालकांच्या वाणीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रांचे वाचन करून आणि त्यांच्या अद्भुत कार्यांच्या विषयी मार्गदर्शन मिळणार आहे. तर यात सकाळी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण व विशेष मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. व सायंकाळी ठीक चार वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.व या भव्य जयंती सोहळ्यास हुस्सा व हुस्सा परिसरातील आंबेडकरवादी व सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जयंती मंडळाचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी केले आहे.