भाजपा तर्फे आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

मुदखेड ता. प्रतिनिधी/ राहूल कोलते 

मुदखेड दि. ११ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वतीने दिनांक 13 एप्रिल ते 25 एप्रिल पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभियान प्रत्येक बुथवर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे अभियान यशस्वीरित्या राबविण्यासाठी प्रदेश स्तरावर एक समिती गठीत करण्यात आली असून या समितीचे प्रदेश संयोजक म्हणून ॲड.भरत पाटील, प्रदेश सहसंयोजक म्हणून शशिकांत कांबळे, मुंबई विभागाचे संयोजक म्हणून विजय भाई गिरकर, ठाणे कोकण विभागाचे संयोजक म्हणून प्राध्यापक आरती पुगावकर पश्‍चिम, महाराष्ट्राचे संयोजक म्हणून आ.अमित गोरखे, विदर्भ विभागाचे संयोजक म्हणून ऍड. धर्मपाल मेश्राम, मराठवाडा विभागाचे संयोजक म्हणून पंडित सूर्यवंशी, उत्तर महाराष्ट्राचे संयोजक म्हणून सचिन आरडे यांची निवड करण्यात आली आहे. या समितीमार्फत संपूर्ण राज्यातील बुथ, मंडळ व जिल्हा निहाय्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभियानाचे संचलन केले जाणार आहे. अशाच प्रकारची त्रिस्तरीय समिती प्रत्येक जिल्ह्याला नेमन्यात आली आहे. भाजपा नांदेड उत्तर जिल्ह्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभियान संचलन समितीचे प्रमुख संयोजक जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड, अनुसूचित जाती मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष विलास साबळे, हदगाव विधानसभा संयोजक म्हणून व्यंकटेश लोणे, किनवट विधानसभा संयोजक म्हणून प्रदीप एडके यांच्या नेमणुका भाजपा नांदेड उत्तर जिल्ह्याचे अध्यक्ष ऍड. किशोर देशमुख यांनी केल्या आहेत.

 या समितीमार्फत जिल्ह्यातील मंडळ व बुथ निहाय कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. भाजपाचे सर्व पदाधिकारी दि. 13 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, विहार, प्रतिमा सजावट व परिसर स्वच्छता करून जयंतीच्या पूर्वसंध्येला बुथ व मंडळ निहाय दीपोत्सव कार्यक्रम करनार आहेत. याचप्रमाणे राज्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थान शिक्षण वास्तव्य व जीवन प्रवास या ठिकाणी प्रदेशाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.14 एप्रिल रोजी शहरातील मिरवणुकीत सहभागी होऊन शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी विनम्र अभिवादनाचे बॅनर होल्डिंग लावन्यात येणार असून, मिरवणुकीच्या ठिकाणावर शरबत वाटप करण्यात येणार आहे. भाजपा वैद्यकीय आघाडीच्या वतीने दलित वस्त्यांमध्ये आरोग्य शिबिर आयोजन करण्यात येणार आहेत, प्रत्येक बूथ वर वस्तीतील अंगणवाड्यात भेटवस्तू व खाऊचे वाटप करण्यात येणार आहे, प्रत्येक बुथवर प्रतिमापूजन व संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे.

 दिनांक 15 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान संघटनात्मक प्रत्येक जिल्ह्यात समाजातील प्रबुद्ध,प्रतिष्ठित प्रभावी व्यक्तींचे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनासाठी भाजपच्या प्रदेश कार्यालयातून प्रत्येक जिल्ह्याला एक वक्ता कळविण्यात येणार आहे. तेव्हा या संपूर्ण कार्यक्रमात भाजपाच्या आमदार खासदार मंत्री बुथ मंडळ व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सर्व कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन भाजपा नांदेड उत्तर जिल्ह्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभियानाचे संयोजक तथा जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!