कमी पटसंख्या असलेल्या त्या जि.प.च्या त्या शाळा चालू करा – बालाजी पाटील खतगावकर

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील मुखेड तालुक्या मधील जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत चालू असलेल्या पण सध्या कमी पटसंख्या दाखवून बंद असलेल्या त्या शाळा महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री मा.ना.डॉ.पंकज भोयर साहेब यांची मुंबई येथे भेट घेऊन माझ्या मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील पटसंख्या अभावी बंद करण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळा पूर्ववत सुरू करावी अशी विनंतीबालाजी पाटील यांनी आपल्या मतदार संघातील गोर गरीब जनतेची लेकरं शिक्षणा पासून अलिप्त राहूनये म्हणून विनंती केली आहे.

सन 2018 मध्ये पटसंख्या चे कारण देत जिल्हा परिषद शाळा बंद करण्यात आले आहे. त्यापैकी बापशेटवाडी ग्रामपंचायत अंतर्गत सुरानूरा तांडा, बादावत तांडा व दामला तांडा येथे जिल्हा परिषद शाळा सुरू होत्या, परंतु तत्कालीन गट शिक्षणाधिकारी, मुखेड यांनी चुकीचा मूल्यांकन अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करून या तिन्ही तांडयांच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

   मुखेड तालुक्यातील सुरानूरा तांडा व परिसरातील 30 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या उपलब्ध असलेल्या गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मुखेड यांनी जिल्हा परिषद नांदेड यांना सदरील ठिकाणी पूर्ववत शाळा सुरू करावी म्हणून सदर अहवाल सादर केला आहे.

तरी या सुरानूरा तांडा व परिसरातील पूर्ववत शाळा सुरू करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना आदेशित करावे अशी सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती केली.

Share This Article
error: Content is protected !!