आत्महत्या नव्हे तर ही एक सरकारच्या अपयशाचा बळी ; खा.रविंद्र वसंतराव चव्हाण सांत्वन पर भेट

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील धर्माबाद तालुक्या मधील पाटोदा थडी येथील हरिदास विश्वंभर बोंबले या शेतकऱ्याने महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कुंडलवाडी यांच्या कर्ज वसुलीला कंटाळून फाशी घेऊन आत्महत्या केली. व सतत ची नापिकीमुळे,ओला दुष्काळ तर कधी कोरड दुष्काळ निसर्गाचा लहरीपणा,मालाला कमी बाजारभाव म्हणजे शेतकरीची आर्थिक मंदी,रोजगार उपलब्ध होत नाहीत.लाडकी बहिण योजना देउन सरकार लोकांना निवडणुकीच्या प्रचारार्थ भलत्याच थापा देऊन कर्जमाफीच आश्वासन दिले पण आश्वासन पूर्ण करताना मात्र नरडीचा घोट वसुलीनामा सरकार करीत आहेत 

सरकार कर्जमाफी करतो म्हणून निवडून येते आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करावे लागतात यापेक्षा दुर्दैव कोणते बँकेच्या सततच्या रेट्यामुळे या शेतकऱ्याला आपली जीवनगाथा संपवावी लागली या शेतकऱ्याप्रती भावना व्यक्त करताना या निष्क्रिय सरकारचा खासदारांनी जाहीर निषेध केला आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना धीर देऊन शासकीय मदतीच्या पाठपुराव्या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

   यावेळी धर्माबाद तालुक्यातील सर्व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ मंडळी गावातील सर्वश्रेष्ठ युवक वर्ग शेतकरी कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे एपीआय शिंदे साहेब महसूल अधिकारी ग्रामसेवक तलाठी उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!