कोणीही पक्ष सोडून गेले तरी आगामी काळ काँग्रेस पक्षाचाच ; कार्यकर्त्यांनी सगज राहावे- खा.डाॅ.कल्याण काळे

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

भोकर येथे काँगेस पक्षाची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

भोकर प्रतिनिधी/सुभाष नाईक 
भोकर – काँग्रेस पक्षाच्या जीवावर राजकारण करून मोठे होत कोणी कुठे ही गेले तरी काँग्रेस पक्षाची ऊर्जा संपणार नाही म्हणून आगामी काळ हा काँग्रेस पक्षाचाच राहील यासाठी कार्यकर्त्यांनी सगज रहावे असे प्रतिपादन काँग्रेस पक्ष निरीक्षक खासदार डॉ. कल्याण काळे यांनी भोकर येथील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक आढावा बैठकीत केले.

     राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची भोकर विधानसभा मतदार संघातील संघटनात्मक आढावा बैठक भोकर येथील शासकीय विश्राम करावा दिनांक १८ एप्रिल रोजी घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार रवींद्र चव्हाण हे होते. यावेळी आढावा बैठकीसाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्ष निरीक्षक म्हणून खासदार कल्याण काळे हे बोलत होते. यावेळी या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून परभणीचे माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम ,प्रदेश सदस्य केदार साळुंखे, बालाजी पाटील गाडे, सुरेंद्र घोडसकर, पप्पू पाटील कोंढेकर हे उपस्थित होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षांनी अनेकांना खूप मोठे केले अनेक महत्त्वाची पदी दिली, त्यांचा मान सन्मान केला. परंतु अशाच काही गद्दार लोकांनी पक्ष सोडून पळ काढला. परंतु मतदार बांधव आता जागा झाला असून अशा गद्दारांना त्यांची जागा दाखवून देतील असे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मांना गोरगरिबांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे काँग्रेसचे विचार प्रत्येक घरात घरात पोहोचले असल्यामुळे काँग्रेस पक्ष हा कधीच न संपणारा पक्ष आहे. तेव्हा काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने सगळेच रहावे. असे आव्हाऩ त्यांनी केले.

    तसेच पक्षाची संघटना संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्टी व प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा कमिटी, तालुका कमिट्या, सर्कल कमिट्या या सर्वांच्या विचार विनिमयातून सर्व संघटना पुनर्जीवित करून प्रामाणिक व होतकरू कार्यकर्त्यांना विविध पक्ष संघटनांमध्ये स्थान दिल्या जाईल अशी गव्हाही दिली. अध्यक्षीय समारोप करताना खासदार रवींद्र चव्हाण म्हनाले की, केंद्र सरकारने वक्फ बोर्डाचा निर्णय घाई गडबडीत घेतला. भाजप जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचं काम करीत आहे. भोकर मतदारसंघातील जनता काँग्रेसच्या बाजूनेच आहे यापुढेही नांदेड जिल्ह्यात पुन्हा काँग्रेसने वातावरण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन केले. यावेळी भोकर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद बाबा गौड, श्रावण ऱ्यापनवाड,सुभाष किन्हाळकर, कैलास गोडसे, तोशिक इनामदार, लक्ष्मण डोंगरे, भारतीबाई पवार, विजयालक्ष्मी करेमगार, सुरेखा माळे, एल. ए. हिरे, युवा नेते संदीप गौड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन माधव शिंदे यांनी केले. यावेळी भोकर विधानसभा मतदारसंघातील भोकर, मुखेड व अर्धापूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!