भोकर तालुक्यात ग्राम जयंती महोत्सव कार्यक्रम

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

२२ ते ३० एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन

भोकर प्रतिनिधी/ सुभाष नाईक

भोकर – ग्रामस्वच्छतेचा, गावाच्या विकासाचा महामंत्र देणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ११६ वी जयंती अर्थात ग्रामजयंती उत्सव २२ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान भोकर तालुक्यात साजरा होणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्राम सुधारणा करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ गावाच्या उन्नतीसाठी अर्पण केला आहे शासनाच्या वतीने देखील ग्रामस्वच्छता अभियानाची चळवळ त्यांच्याच नावाने सुरू करण्यात आली आहे भोकर तालुक्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा प्रसार प्रचार करण्यासाठी ग्रामजयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे २६ एप्रिल २०२५ रोजी भोकर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक समिती आश्रमात ग्राम जयंती उत्सव साजरा केल्या जाणार असून या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून राजेंद्र खंदारे प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय मुंबई, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंग शेट्टी, तहसीलदार विनोद गुंडमवार, गटविकास अधिकारी माधव केंद्रे, पोलीस निरीक्षक अजित कुंभार, मुख्याधिकारी ऋषभ पवार, भाऊसाहेब बऱ्हाटे यांची उपस्थिती लाभणार आहे २७ एप्रिल रोजी सकाळी ९:३० वा. ग्रामस्वच्छता अभियानातील बक्षीस पात्र ठरलेल्या ग्राम पंचायती व स्वच्छता अभियान राबविणाऱ्या हाडोळी, नागापूर, नारवट, कांडली, खडकी, पांडुरना, बेंबर, कोळगाव(बु) सोनारी आदी गावांचा सन्मान करण्यात येणार आहे. २२ एप्रिल रोजी नांदा, २३ रोजी हळदा, २४ रोजी रिठा, २५ रोजी सोनारी, २६ रोजी भोकर, २७ रोजी रायखोड, २८ रोजी धानोरा, २९ रोजी जमदारी, ३० रोजी कोळगाव या गावात ग्राम जयंती उत्सव साजरे होणार आहेत. गोपाळ महाराज मुरझळेकर, गंगाधर गिरोड गुरुजी, प्रेम महाराज व्हिसल जि. बुलढाणा यांचे कीर्तन व गुरुवर्य चैतन्य महाराज कोंडदेव नगर, सुभाषराव वानखेडे, गोविंद पाटील टेंभी, गोविंदराव माऊली पार्डी, परमेश्वर पाटील इंगळे, गजानन पाटील आबादार, निर्मलाताई खडतकर, प्रा. बालाजी कोंपलवार यांचे ग्रामगीता प्रवचन होणार आहे. ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन शेषराव पाटील जामदरी टेकडी, बापूराव पाटील भोकर, आश्रम संयोजक गंगाप्रसाद जामदरी, बी. आर. पांचाळ भोकर आश्रम, उत्तमराव दिवशी कर, प्रकाश पाटील कोंडलवार, सुभाष पा. कोळगावकर, बालाजी पा, कोळगावकर, गणेश गुरुजी दुमलवाड यांनी केले आहे

Share This Article
error: Content is protected !!