नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास धर्माबाद नगर पालिका अकार्यशम

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

रोड वरील अतिक्रमाणावर अर्थपूर्ण दुर्लक्ष

शाळा,कॉलेज,खाजगी क्लासला,जाणाऱ्या विध्यार्थीनींची हेळसांड

पालकवर्गात प्रशासना विषयी नाराजगी

विभागीय संपादक:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – दि.१६.जिल्यातील धर्माबाद शहरा मधील मुख्यरस्त्यावरील झालेले अतिक्रमण असो की पार्किंगची समस्या मुख्य रस्त्यावरील बांधकाम साहित्य महिनो महिने तसेच पडून असल्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे त्यातच अवैध प्रवाशी ऑटो थांबे जसे लालबहादूर शास्त्री कॉलेज रोड,धर्माबाद ग्रामीण रुग्णालयास जाणाऱ्या रोड,जिल्हा परिषद हास्कुल जाणाऱ्या रोडवरील हुतात्मा गोविंदराव पानसरे स्मारका समोरील ऑटो,हु.पानसरे हास्कुल,केशव शाळा, जाणाऱ्यारोडवरील सर्व ऑटो थांब्यामुळे शहरातील रोड आधीच अरुंद त्यात शहरातील मोठया व छोटया दुकानदारांकडून त्यांच्या दुकानं समोर सरकारी रोडवर ३×४च्या लोखंडी जाळ्या (कोणीही दुकाना समोर आपली गाडी उभी करून नये )त्यात दुकानातील अर्धा विक्री माल ५ ते १० फूट रस्त्यावर्च असल्यामुळे व बेशिस्त ऑटो चालकांच्या वर्तनामुळे ऑटोचालक आपले वहाने वेवस्थित चालवत नसल्यामुळे त्या रोडवरून शहरातून ये जा करणाऱ्या महिला शाळेतील लहान मुलं-मुलीना होणाऱ्या भयंकर त्रास विनाकारण सहन करावा लागत आहे.

सदरील रोडवर शहरातील नामांकित तीन माध्यमिक तर चार प्राथमिक शाळा व शहरातील एकमेव कॉलेजला जाणारा रोड व शहरातून एखाद्याला एमर्जंशी रुग्णाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करावयाचे असले तर त्या रोड वरून तात्काळ त्याला घेऊन सुद्धा जाता येणार नाही.

या सर्व प्ररकारावर लक्ष देऊन मा. पोलीस अधिकारी मा. मुख्याधिकारी धर्माबाद नगर पालिका व प्रतिष्ठान व्यक्तींनी सदरील रस्त्यावरील अवैध प्रवाशी ऑटो धाबे इत्रस्त हालऊन शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मुला मुलींना महिलांना व नागरिकांना योग्य न्याय मिळावा अशी जनतेतून दबक्या आवाजात चर्चा होताना कानी पडत आहे.

Share This Article
error: Content is protected !!