सीटू जिल्हा कमिटीच्यावतीने १मे या जागतिक कामगार दिनी होणार कॉ.शिलाताई,वर्षाताई व सुनिताताई यांचा सन्मान
माहूर तालुका प्रतिनिधी /बजरंगसिंह हजारी
दि.२३ एप्रिल : आरोग्य अभियानातील महत्वाचा दुवा असलेल्या गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे पहिले राज्य अधिवेशन नुकतेच २० एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे पार पडले.
अधिवेशनात नांदेड जिल्ह्यातील तालुका माहूर येथील कॉ.शिलाताई ठाकूर यांची राज्य अध्यक्षपदी तर गटप्रवर्तक कॉ.वर्षाताई सांगडे व कॉ.सुनीताताई पाटील यांची राज्य कमिटी सदस्य पदी एकमताने निवड करण्यात आली.
या अधिवेशनाला मार्गदर्शन करण्यासाठी उद्घाटक म्हणून सीटूचे राज्य सरचिटणीस ॲड.कॉ.एम.एच.शेख,राज्य कोषाध्यक्ष कॉ.के.आर.रघु,राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार,कॉ.वसंत पवार,आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य अध्यक्षा कॉ.आनंदीताई अवघडे, कोषाध्यक्ष कॉ.
अर्चनाताई घुगरे यांची प्रमुख उपस्थिती होती, अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून राज्यभरातून मोठ्या संख्येने गटप्रवर्तक ताई पंढरपूर येथे एकत्रित आल्या होत्या, अधिवेशनात पुढील तीन वर्षासाठी नूतन राज्य कमिटी निवडण्यात आली असून राज्य कमिटी मध्ये एकूण ५७ सदस्य असून १९ पदाधिकारी निवडण्यात आलेले आहेत.
त्यात नांदेड जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगराळ तालुका म्हणून परिचित असलेल्या माहूर येथील कॉ.शिलाताई ठाकूर यांची राज्यअध्यक्ष तर सरचिटणीसपदी कॉ.पुष्पा पाटील आणि कोषाध्यक्षपदी कॉ.ज्योती उराडे यांची एकमताने निवड करण्यात आली.सदरील राज्य कमिटी मध्ये नांदेड जिल्ह्यातील गटप्रवर्तक कॉ.वर्षाताई सांगडे व कॉ.सुनीताताई पाटील यांची राज्य कमिटी सदस्य पदी निवड करण्यात आली.
उपरोक्त निवड झालेल्या तिघीही गट प्रवर्तक ताई ह्या नांदेड जिल्हा कमिटीत पदाधिकारी असून कामगार – कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांवर प्रशासनासमोर वेळोवेळी आवाज उठवत त्यांच्यासाठी लढणाऱ्या रनरागिणी आहेत.
जिल्हा कमिटीच्यावतीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.१ मे या जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात सीटू नांदेड जिल्हा कमिटीच्यावतीने कॉ.शिलाताई ठाकुर, कॉ.वर्षाताई सांगडे व कॉ.सुनीताताई पाटील यांचा सन्मान करण्यात येणार आहे.