महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी भीमराव बैलके यांची निवड…! 

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नायगांव / प्रतिनिधी (अशोक वाघमारे)

नायगाव – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हास्तरीय महामंडळ सभा दि.18 एप्रिल 2025 रोजी हॉटेल ताज येथे संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष केशवराव जाधव हे होते. या सभेत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य सल्लागार पदी निलकंठ चोंडे यांची तर राज्य उपाध्यक्षपदी व्यंकट कल्याण पॅड यांची निवड करण्यात आली तर नांदेड जिल्हा अध्यक्षपदी शंकर हसगुळे तर नांदेड उपजिल्हाध्यक्षपदी भीमराव बैलके यांची निवड करण्यात आली . राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्याविषयी आणि संघटनेचे कार्य संघाचा इतिहास शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हास्तरीय संघटनेचे करायची कामे याविषयी राज्य नेते माधवराव पाटील राजे सरचिटणीस लायक पटेल यांनी सविस्तर मार्गदर्शन केले .

     याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी पी एस बोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील 35 उपक्रमशील शिक्षकांचा वाडी तांड्यावर त्यांनी जीव ओतून जिल्हा परिषदेच्या शाळेचा विकास केला अशा उपक्रमशील शिक्षकांचा त्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला . बोरगावकर यांनी. शिक्षकांना मार्गदर्शक तत्वे व मूलभूत हक्काविषयी सखोल असे मार्गदर्शन केले . याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रस्ताविक निळकंठ चोंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शंकर हसगुळे यांनी मांडले.

Share This Article
error: Content is protected !!