पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतात्म्यांना नगर पंचायत प्रांगणात श्रद्धांजली!

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

माहूर तालुका प्रतिनिधी/ बजरंगसिंह हजारी 

माहूर – काश्मीरच्या पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या अमानवीय दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या क्रूर कृत्याचा निषेध करण्यासाठी आणि मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माहूर नगर पंचायतच्यावतीने आज शुक्रवार दिनांक २५ रोजी सायंकाळी ७ वाजता एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी मेणबत्ती प्रज्ज्वलित करुन व काळ्या फिती लावून मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मंगळवार 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला.ज्यात पर्यटनासाठी आलेल्या २८ निष्पाप भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यु झाला. तर अनेक पर्यटक,स्थानिक व्यावसायिक,नागरिक जखमी झालेत. या हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली असून या घटनेबाबत देशभरातुन तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारने पहलगामसह जम्मू काश्मीर मधील सर्व पर्यटन स्थळाची सुरक्षा व्यवस्था अधिक चोख करावी आणि दहशतवाद्यांना कठोर शिक्षा करुन धडा शिकवावा अशा मागणीचा एकसूर नगराध्यक्ष फिरोज दोसानी, मनोज कीर्तने, अजीम सय्यद, नंदू संतान यांनी निषेधात्मक भाषणातून काढला.तर नायब तहसीलदार डॉ.राजकुमार राठोड,महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक दिगंबर पाटील, डॉ. विपिन बाभळे यांनी हल्ल्यातील मृतांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी प्रार्थना करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

  दहशतवादी हल्ले हे मानवतेवर घाला घालतात.पहलगाम मधील निष्पाप भारतीय पर्यटक नागरिकांची हत्येची घटना ही प्रत्येक भारतीयांच्या मनाला अतिशय वेदना देणारी असून केंद्र सरकारने यासारख्या घटनांवर आळा घालण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची आणि जशास तसे ठोस उत्तर देण्याची गरज असल्याचे सांगत….

“तुम गोली चलाओ हम सीने पर खायेंगे। तुम सर काटोगे यहा दस सर उठायेंगे। और ये हिंदुस्तान की मिट्टी है साहब। यहां हर घर से भगतसिंग निकलकर आएंगे!अशा विररस जागवणाऱ्या शायरीतुन नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या निष्पाप पर्यटकांच्या आत्म्याला श्रद्धांजली वाहिली.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, उपनगराध्यक्ष नाना लाड,नगरसेवक विजय कामटकर, नगरसेवक गोपू महामुने, रणधीर पाटील,आकाश कांबळे, इरफान सय्यद, रफिक सौदागर, सुमित खडसे,निसार कुरेशी, अप्सर अली,विक्रम राठोड,वसंतराव कपाटे,विजय आमले,पद्मा गिऱ्हे,अपील बेलखोडे,नगरसेवक प्रा.विलास भंडारे,अजीम सय्यद,किसन राठोड,किशोर जगत, गजानन भारती, दत्ता शेरेकर,सिद्धार्थ तामगाडगे,दीपक कांबळे,रेणुकादास वानखेडे, गोविंद मगरे पाटील,मझर खान, शकील शहा, इरफान टेलर, अशीफ पैलवान,मुस्ताक शेख,शफीक शेख, बाबर अहमद,नाना पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. संचलन एस.एस.पाटील यांनी केले तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share This Article
error: Content is protected !!