पहलगाम हल्ल्याच्या धर्मांध शक्तीला ठेचून काढण्याची हीच वेळ..खा.डॉ.अजित गोपछडे

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे काल आतंकवाद्यांनी केलेले हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.भारत सरकार या हल्ल्याचे जशास तसे उत्तर देईल.त्यासाठी हिंदुस्तान मधील तमाम जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची वेळ आहे असे मत खा.डॉ.अजित गोपछडे यांनी व्यक्त केले .

जम्मू कश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर खऱ्या अर्थाने काश्मीरमध्ये लोकशाही निर्माण झाली आहे.ही लोकशाही निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा आणि भारत सरकारने महत्त्वाची भूमिका घेतली आहे.

कलम 370 हटवल्यानंतरच काश्मीरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्यास सरकारला यश आले आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी विशेष लक्ष दिलेले आहे.भारताचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्राला संधी मिळाली आहे.तेथील स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळु लागला त्यामुळे सर्वसामान्य कश्मिरी खुष होते.देश विदेशातील पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये येऊ लागले आहेत या सर्व सकारात्मक आणि काश्मीर चा विकास या गोष्टी आतंकवाद्याना आणि धर्मांधशक्तीला पटल्या नाहीत . त्यामुळे जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा लक्ष करण्याचे काम आतंकवाद्याकडून झाले आहे

काल झालेल्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा देशभरातील विविध राज्यातील आणि विदेशातील कांही पर्यटकांचा जीव गेला आहे.

ज्या पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले त्यांच्या प्रति आम्ही सद्भावना व्यक्त करतो.या भ्याड हल्ल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा आणि भारत सरकार निश्चितपणे जशास तसे उत्तर देऊन त्यांचा आतंकवाद उखडून काढतील . यासाठी भारताला आंतरराष्ट्रीय पाठबळ मिळत आहे.

 

त्यामुळे येत्या काही दिवसांत ते सर्व हल्लेखोर पकडले जातील आणि त्यांना कठोरातील कठोर शासन केंद्र सरकार करेल.धर्म विचारुन गोळ्या घालणाऱ्या धर्मांध शक्तीला आता ठेचून काढण्याची वेळ आली असल्याचेही खा.डॉ.अजित गोपछडे म्हणाले.

Share This Article
error: Content is protected !!