उद्धव मामडे यांना कोल्हापूरी राज्यस्तरीय आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

उमरी तालुका प्रतिनिधी//उध्दव मामडे 

उमरी :- तालुक्यातील निर्भीड पत्रकार उद्धव मोहनराव मामडे रावधानोरकर यांना “युवा क्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य परिते ता.करविर जिल्हा कोल्हापूर च्या वतीने २०२५चा राज्यस्तरीय जनसेवा आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार अनेक दिग्गज मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.                     

आयोजक “युवा क्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य परिते ता.करविर जि.कोल्हापुर यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य पुरस्कार सोहळा दि.४मे रोजी प्रसिद्ध समाजसेवक,समाजसेविका,

अभिनेत्री,लेखक,गायक,गायिका शिक्षक हिरकणी अश्या मान्यवरांच्या पुरस्कारार्थीना दि.४मे २०२५ रोजी परिते ता.करविर जिल्हा कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आला येणार आहे.                          

    युवा क्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्था हि अनेक गोरगरीब गरजूंना मदत सतत,करत असतात कोरोनाच्या महामारीत अन्न धान्य,किराणा सामान, कपडे, औषध उपचार करण्यात मदत केली,परिते परिसरातील अडीअडचणीत पाणी टंचाई, दुष्काळग्रस्ताना मदत अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम हि युवा क्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्था कामे केली व सतत करत असतात. या पुरस्कार कार्यक्रमास अनेक मंत्री महोदय दिग्गज कलाकार दिग्दर्शक उद्योजक राजकीय अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत राहणार आहेत.                                         

  

उद्धव मामडे रावधानोरकर यांना पत्रकारीता क्षेत्रामधील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला असून त्यांना यापूर्वीही राज्यस्तरीय पत्रकारीता सामाजिक,विविध क्षेत्रातील आतापर्यंत ४९ पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श व्यक्तीला विविध पुरस्काराने,

विविध व्यक्तींना राज्यस्तरीय हा पुरस्कार दिला जातो. यामध्ये राज्यस्तरीय पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक,राजकीय, पत्रकार उद्धव मोहनराव मामडे रावधानोरकर यांना हा ‘मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा’ हा राज्यस्तरीय जनसेवा आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कार २०२५चा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्हातील शिक्षक वृंद, राजकीय पक्ष पत्रकार बांधव माझ्या कुटुंबासह मित्र परिवार सर्व स्थरातून त्यांच्या कौतुकाचा वर्षांव होत आहे.

Share This Article
error: Content is protected !!