उमरी तालुका ग्रामपंचायतीवर महिला राज सरपंच पदांचे आरक्षण सोडत

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

उमरी तालुका प्रतिनिधी उध्दव मामडे 

उमरी – तालुक्यातील बहुतांश गावातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण महिलांना सोडण्यात आला आहे.सदर,तालुक्यात ५८ ग्रामपंचायत असून यात निवडणुकीसाठी सरपंचपदाची सोडत उमरी तहसील कार्यालयाच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. निर्वाचन अधिकारी तहसीलदार प्रशांत थोरात यांनी आरक्षण जाहीर केले.

  यावेळी नायब तहसीलदार संजय सोनकर, संजय देवराये देसटेवाड,तलाटी खानसोळे आदी उपस्थित होते.यात सर्वसाधारण खुल्या गटासाठी करकाळा,गोळेगाव,बिजेगाव, नागठाणा खुर्द, तळेगाव, सावरगाव दक्षिण, कौडगाव,बोरजुनी, मंडळा, बोथी, हस्सा, हातनी,सोमठाणा उप, तर सर्वसाधारण महिला गटासाठी भायेगाव,शिवनगाव, अस्वलदरी, सिंधी,बळेगाव, बोळसा गंगा पट्टी,गोरठा,इळेगाव, कावलगुडा खुर्द,राहटी खु, कुदळा, मोंखडी, शिंगणापूर,फूलसिंगनगर वसंतनगर,अब्दुलापूर, आदीचा समावेश आहे.

    नामाप्रसाठी कावलगुडा बुद्रुक,नागठाणा बुद्रुक,महाटी येंडाळा, वाघाळा,मनूर, हुंन्डा गंगा पट्टी तर ना.मा.प्र.महिला आरक्षणामध्ये जिरोणा,बेलदरा मियादादपुर, जामगाव,तुराटी,धानोरा बु. वाघलवाडा,शेलगाव आदीसाठी आरक्षण सोडत झाली तर अनुसूचित जातीसाठी ग्रामपंचायत सोडतीमध्ये हिरडगाव, रामखडक, चिंचाळा, ईश्वरनगर दुर्गानगर, इजतगाव अमदापुर, तर महिला गटांसाठी सावरगाव कला,पळसगाव, बितनाळ, गणिपुर,बोळसा बुद्रुक खुर्द,हुंडा पट्टी आदीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. अनुसूचित जमातीसाठी आरक्षण सोडतीमध्ये शिरूर,हंगिरगा,तर महिला अनु जमाती गटांसाठीनि मटेक, कारला, कळगाव आदी ५८ ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत थोरात यांनी दिली.

Share This Article
error: Content is protected !!