उमरी तालुका प्रतिनिधी उद्धव मामडे
उमरी :- धानोरा बु.येथील दि.२२ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७/ते ८ च्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने गट क्रमांक ४५३ मधील शेतकरी अनिल बापुराव सर्जे यांच्या शेतातील हज कंपनी सोलारवर झाडाचे फांदी वादळी वाऱ्याने तुटून ११ते१२ फ्लॅटचे अतोनात नुकसान झाला आहे.
सदर, धानोरा बु.परिसरात २२ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता ढगाळ वातावरण निर्माण होत कधी हलकासा पाऊस पडत असतानाच अचानक वादळी वारा सुरू झाला याप रिसरात वाढत गेला यात मौ.धानोरा बु.ता.उमरी येथे दि.२२/४/२०२५ रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे झाडाची फांदी तुटून गट क्रमांक ४५३ मध्ये “अनिल बापुराव सर्जे यांच्या शेतातील कंपनीचे सोलार प्लाँटचे ११ते १२ प्लेट नुकसान ग्रस्त झाला आहे. या झालेल्या नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी अनिल बापुराव सर्जे धानोरा बु.यांनी केला आहे.