नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – महाराष्ट्र सिमेलगतच्या तेलगाणा पोलिसांच्या कारवाहीत I P L सट्टेबाजीत एका पेट्रोल पंपावर काम करणार्या कामगारांने पाच लाख रुपये सट्टायात हरल्यामुळे आत्म हत्या केली होती तेलगाणा सरकारने हिबाब गंभीरते ने घेऊन तेलगाणा सरकारने पोलीस प्रशासनास कारवाही करण्यास सांगितल्या वर निझामाबाद पोलीस अधीक्षक यांनी या सट्टेबाज लोकांचे पाळेमुळे शोधन्यास सुरुवात केली हे प्रकरण आपल्या अलगट येणार हे ओळखुन नांदेड जिल्यातील आरो अँप द्वारे सट्टा खेळवल्या जात असल्याचे व धर्माबाद येथे मुख्य सूत्रधार आपल्या दलाला मार्फतआय पी एल सट्टा घेत असल्याचे निदर्शनात आले असल्या मुळे तेलंगणा पोलीस भूमिगत झालेल्या राज आश्र्यातील सूत्रधार व त्यांच्या एजंट यांच्या शोधत आहेत.
सध्या सुरू असलेल्या आयपीएल हंगामावर जिल्यात मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने सट्टेबाजी सुरू असल्याचे नागरिकाकडून बोलले जातात आहे.
क्रिकेटचे वेड असलेली व कमी वेळात जास्त पैसा मिळवण्याच्या लोभापायी या सट्टेबाजी तरुण पिढी बरोबर होत आहे.मात्र छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या या सट्टेबाजीवर ठोस कारवाई जिल्यातील सट्टा घेणाऱ्या वर होताना दिसत नाही.मा.शहाजी उमाप साहेबांच्या काळातही कारवाईकडे कानाडोळा झाल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षी आयपीएल दरम्यान अनेक लोक मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी करतात.यातून लाखो रुपयांची उलाढाल होते.आयपीएल बॅटिंग रॉकेट चालवणाऱ्या टोळ्या या सक्रिय असतात.आयपीएल बुकीकडून लॅपटॉप,मोबाईल,फोन,टेलिव्हिजन,संच आणि इतर सट्टेबाजी च्या वस्तूंचा यासाठी वापर केला जातो.एजंट लोकांकडून सट्टा घेतात आणि ते फोनवर आधारित क्रिकेट सट्टेबाजी आपलिकेशनद्वारे कुकीकडे जातात.सट्टेबाजांना त्यांच्या फोनवर ॲप इंस्टॉल करण्यास सांगितले जाते.अंतिम निकाल आणि इतर बाबींवर सामान्य दरम्यान हे बेट घेतले जाता असतात,दुसऱ्या दिवशी सकाळी ते निकाली काढला जातो,सट्टा किंग मेहनत न करता भरपूर पैसे मिळवण्याचे लालच दाखवून विद्यार्थ्यांना सट्टायाच्या जाळ्यात ओढत आहेत.यावर्षी तर सत्ता खेळणाऱ्या मध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.
ह्या सट्टाच्या बाजारात सट्टा लावणारी व्यक्ती एजंट किंवा ज्याला फंटर म्हटले जाते त्याच्यामार्फत बुकीशी संपर्क साधतो.मोबाईल ॲप्लिकेशन आहे यावरून उघड उघड सट्टा खेळता येतो.सट्टा खेळण्यासाठी त्या व्यक्तीला सुरुवातीला एजंटला काही रक्कम अडव्हान्स म्हणून द्यावी लागते. मग त्या व्यक्तीचे अकाउंट उघडले जाते.ह्या अकाउंटला एक लिमिट असते.मग त्यांच्याकडून सट्टेबाजी जोरात सुरू असते.त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अनेक गुन्ह्याची उकल करण्यात माहेर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ( एलसीबी) पोलिसांना मात्र सट्टेबाज बुकि सापडत नसल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.