भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती लालवंडी येथे मोठ्या उत्साहात साजरी….!

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नायगाव  प्रतिनिधी  अशोक वाघमारे

नायगाव  – लालवंडी ता. नायगाव जि. नांदेड येथे भीम जयंती साजरी करण्यात आली. पहिल्या सत्रात ग्रामपंचायत कार्यालय लालवंडीचे सरपंच, गावचे प्रथम नागरिक सौ. अश्विनी प्रकाश जोंधळे यांच्या शुभ हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

    त्या नंतर उपस्थित मान्यवर व नवधर्मांतरित व्यक्तिमत्व बाबारावजी इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रमुख व्याख्याते, प्रोफेसर, डॉ. बलभीम वाघमारे सर ( फुले शाहू आंबेडकरी विचाराचे गाढे अभ्यासक ), माधव दादा जमदाडे ( रिपब्लिकन पक्ष मराठवाडा अध्यक्ष ), उद्धव सर ढाकणीकर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सन्मानित मुंबई), मधुकर झगडे, भगवानराव पा. लंगडापुरे (चेअरमन,उपसरपंच) या सर्वांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची सखोल अशी माहिती आणि आजच्या समजासमोरचे उधिष्ठे / आव्हाने आपल्या भाषणातून व्यक्त केले.

     त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लालवंडी गावातील उपसरपंच, सेवा सहकार सोसायटीचे चेअरमन भगवानराव पा.लगडापुरे होते. उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व्यंकटराव पाटील इंद्रे, तंटामुक्तीचे अध्यक्ष रमेश पाटील शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गजाननराव गुरूपवार, लक्ष्मणराव चन्नावार. ग्रा.सदस्य शिवाजी पा.जाधव, सामाजिक कार्यकर्ते माधव आप्पा चौधरी, माधराव इंद्रे, पद्मशाली समाजाचे तालुकाध्यक्ष मा. लक्ष्मण चन्नावार साहेब, संदीप केरुरे सर , नामदेव आप्पा, गजानन इंद्रे, प्रल्हाद सावकार, नारायण रुद्रवाड, साईनाथ पा.मोरे, बौद्ध वाड्यातील उपासक,उपासिका, सर्व निमंत्रित पाहुणे मंडळी, गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होती सूत्रसंचालन अशोकराव जोंधळे , व जयंती मंडळाचे सल्लागार प्रवीण जोंधळे, प्रस्तावना उत्तम गुरुजी इंगळे यांनी केली आभार प्रदर्शन जयंती मंडळाचे सल्लागार प्रदीप जोंधळे यांनी मानले .द्वितीय सत्रातील कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्याने डी.जे. च्या आवाजात भिम गिताने जय घोष देऊन हर्ष ऊल्लासात अतिशय आनंदी वातावरणामध्ये मिरवणूक काढण्यात आली. व तृतीय सत्रातील कार्यक्रम ख्यातनाम गायक / कवी शाहीर चंद्रकांत गायकवाड यांचा भीम गीताचा जंगी कार्यक्रम पार पडला. हा भीम जयंतीचा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी नवयुवक भिम जयंती मंडळाचे अध्यक्ष गौतम भाऊ जोंधळे, उपाध्यक्ष रमेश जोंधळे, सचिव उत्तम सूर्यवंशी, सहसचिव संभाजी जोंधळे, कोषाध्यक्ष प्रताप जोंधळे, सदस्य उत्तम जोंधळे, व सर्व नवयुवक बांधव गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेउन हा भिम जयंती सोहळा अतिशय थाटामाटात शांत वातावरणात पार पडला..

Share This Article
error: Content is protected !!