शिका संघटित व्हा संघर्ष करा आरक्षणाचा फायदा घ्या- बालाजी पंतोजी सर

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

उमरी तालुका प्रतिनिधी उध्दव मामडे 

उमरीतालुक्यातील मौ.सोमठाना येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक सरपंच सौ.मंजुषा बालाजी पंतोजी यांच्या शूभ हस्ते महामानव भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व झेंडावंदन करून विनम्र अभिवादन केले आहेत. 

     यावेळी सहशिक्षक बालाजी पंतोजी सर यांनी उपस्थित बौद्ध उपासक उपासीका यांना संबोधित करताना म्हणाले की, मानवाच्या १४ एप्रिल या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे.देशातील कोट्यवधी दीनदुबळ्यांसाठी तसेच देशासाठी हा दिवस फार आनंददायी आहे. या दिवशी दिवसभर मोठ्या उत्साहाने खेड्यापाड्यांपासून ते दिल्लीपर्यंत डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. डॉ. आंबेडकरांच जन्म गरीब कुटुंबात झाला त्यांनी उच्च शिक्षणासाठी म्हणजे एम.ए. पदवीसाठी २५ जुलै १९१३ रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश केला.प्रो.सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनाखाली जून १९१५ मध्ये एम.ए.ची पदवी संपादन केली.

      ऑक्‍टोबर १९१६ मध्ये इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स अँड पॉलिटिकल सायन्स येथे एम.एस.सी. इकॉनॉमिक्‍समध्ये प्रवेश केला. प्रो.कॅनन आणि सेडनी वेब यांच्या मार्गदर्शनाखाली १९२० मध्ये पदवी संपादन केली. पुढे १९२२-२३ मध्ये युनिव्हर्सिटी इन बॉन जर्मनीमध्ये डी.एस.सी. पदवीचा अभ्यास पूर्ण केला व पदवी संपादन केली. म्हणजे एम.ए. , पीएच.डी., एलएल.डी., डॉ. डिलिट,बार ॲट लॉ इत्यादी पदव्यांनी उच्चविद्या विभूषित बाबासाहेब आंबेडकर झाले. 

     डॉ. बाबासाहेबांच्या वाचनात, चिंतनात लेखनात प्रचंड ताकद, शक्ती होती. ज्ञानसंपन्नतेच्या शक्तीमुळेच व्यक्ती,समाज,राज्य, राष्ट्र महान बनत असते, याची त्यांना पुरेपूर जाणीव झाली होती. त्यामुळे १८-१८ तास अभ्यास करून शेकडो वर्षांचा शिल्लक राहिलेला ज्ञानाचा बॅकलॉग बाबासाहेब भरून काढत होते. यासाठी त्यांनी जगाला शोभेल भारताला आधुनिक काळात सर्व प्रकारच्या सुधारणा व सर्वांगीण विकास करता येईल, अशी राष्ट्राला राज्यघटना दिली.२१ व्या शतकात देशाला विकासाच्या दिशेने जावयाचे असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशिवाय पर्याय नाही, असे मला वाटते.शिका संघटीत व्हा शिक्षणा शिवाय पर्याय नाही आईवडील मुलांना शाळेत पाठवा आपल्याला दिलेल्या आरक्षणाचा फायदा घ्या व येत्या 10 में ला बुद्ध विहार च उद्घाटन करण्यात येईल कमिटी स्थापन करा लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ अ‌सेही ते म्हणाले.

   यावेळी,प्रमुख पाहुणे प्रदिप जोंधळे सर (भा.बौध्द महासभा) तालुकाध्यक्ष,पत्रकार डि.जी. तुपसाखरे ,कैलास सोनकांबळे, राजविर पांडुरंग कोल्हेवाड, श्रावणी तुपसाखरे सह अनेक मान्यवर बालकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चारीत्र्यावर भाषणे केली यावेळी,पत्रकार उद्धव मामडे रावधानोरकर,डॉ स्वाती सुपारी मॅडम आरोग्य विभाग,इंदूरकर मॅडम, लक्ष्मण वाळवंटे,सौ.काझी मॅडम, सत्तार मिस्त्री,जळबा यलमवाड यांच्यासह लहान थोर बौद्ध उपासक उपासीका गावातील प्रतिष्ठान नागरिक व पत्रकार बंधू उपस्थित होते.

   जयंती मंडळाच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आभार मानले आहेत.

Share This Article
error: Content is protected !!