६२ ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर…
माहूर तालुका प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी
माहूर: माहूर तालुक्यातील ६२ ग्रामपंचायत सरपंच पदासाठी सन २०२५ ते २०३० या कालावधी करिता आरक्षण सोडत दि.२५एप्रिल 2025रोजी स्व.वसंतराव नाईक सभागृहात सहाय्यक जिल्हाधिकारी झेनिथ चंद्रा दोंथुला यांच्यासह प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार किशोर यादव,गट विकास अधिकारी सुरेश कांबळे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार कैलास जेठे,निवडणूक विभागाचे पेशकार प्रभू पानोडे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.त्यात अनुसूचित क्षेत्रातील ४१ व बिगर अनुसूचित क्षेत्रातील २१ अशा एकूण ६२ ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षित करण्यात आले.
माहूर तालुक्यातील एकूण ६२ ग्रामपंचायत पैकी ४१ ग्रामपंचायत या अनुसूचित क्षेत्रात पेसा अंतर्गत समाविष्ट असल्याकारणाने या ठिकाणी सरपंच पदासह निम्म्यापेक्षा अधिक सदस्य हे अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडले जातात. इतर २१ ग्रामपंचायत मध्ये स्थानिक गावातील लोकसंख्येच्या प्रमाणावर रोटेशन पद्धतीने सरपंच पद आरक्षित केले जाते.
ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता बिगर अनुसुचित क्षेत्रात येणा-या व पुर्णतः अनुसुचित क्षेत्रात येणा-या सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडतीची बैठक पंचायत समितीच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी अनेक गावातील गाव पुढारी उपस्थित होते.आरक्षणाची ईश्वर चिट्ठी काढण्यासाठी ओवी सागर हिवाळे ह्या चिमुकलीने प्रशासनाची मदत केली.
अनुसूचित जमाती (महिला) : टाकळी,वसराम तांडा,गोकुळ नगर,लोकरवाडी,हरडप, उमरा,आष्टा,तुळशी,वाई बाजार, अंजनखेड,सेलू,गोंडवडसा,रुपला नाईक तांडा,दिगडी कु., पानोळा,भोरड,पाचुंदा,साकुरदिगडी धा.,गोकुळ गौडेगाव,बंजारा तांडा.
अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : पडसा,वडसा,सायफळ,मदनापुर,
सावरखेड,सत्तीगुडा,सिंदखेड,मछिंद्र पार्डी,करंजी,भगवती,वायफणी,चोरड,
लसनवाडी,मलकागुडा तांडा,वानोळा,मुंगशी,मेंडकी,हिंगणी,मलकागुडा , मुरली.
बिगर अनसूचित क्षेत्रातील सरपंच पदाचे आरक्षण*मेट (अ.जा.महिला), महादापुर(अ.ज.महिला),लिंबायत(ना.मा.प्र.महिला),दत्तमांजरी(ना.मा.प्र.महिला),मांडवा (ना.मा.प्र.महिला),शेकापुर(ना.मा.प्र.), गुंडवळ (ना.मा.प्र.), आसोली( सर्वसाधारण महिला),लांजी (सर्वसाधारण महिला), लखमापुर(सर्वसाधारण महिला), वजरा शे.फ.(सर्वसाधारण महिला), कुपटी. (सर्वसाधारण महिला),मालवाडा(सर्वसाधारण महिला),रुई (सर्वसाधारण महिला),बोरवाडी (सर्वसाधारण),पवनाळा (सर्वसाधारण),पापलवाडी (सर्वसाधारण),हडसणी(सर्वसाधारण),अनमाळ (सर्वसाधारण), तांदळा (सर्वसाधारण),इवळेश्वर(सर्वसाधारण)