महात्मा बसवेश्वर सामाजिक एकता दौड व भव्य रक्तदान शिबीर संपन्न.. ड्रॉ.अजित गोपछडे

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड :दि.३०.जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीच्या पावन व प्रेरणादायी निमित्ताने “महात्मा बसवेश्वर सामाजिक एकता दौड व भव्य रक्तदान शिबीर”* या जनकल्याणकारी उपक्रमाचे आयोजन जगत ज्योती महात्मा बसवेश्वर विचारमंच, नांदेड यांच्या वतीने अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाले.

या दिवशी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास कृतज्ञतेने अभिवादन करून, त्यांच्या समता,बंधुता आणि कर्मयोगाच्या विचारांना उजाळा देणाऱ्या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन व एकता दौड मॅरेथॉच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण सन्मानपूर्वक करण्यात आले.

यावेळी माझ्या हस्ते सर्व नागरिकांसाठी अन्नदान करण्यात आले,जे समाजातील “सेवा हीच खरी श्रद्धा” या मूल्याचा प्रत्यय देणारे होते.या प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली-माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकरावजी चव्हाण, मराठवाडा विभागीय संघटन मंत्री मा. संजयभाऊ कौडगे, माजी आमदार व जिल्हा महानगर कार्याध्यक्ष मा. अमरभाऊ राजूरकर,प्रवीण साले,चैतन्य बापू देशमुख, मिलिंद देशमुख,भाजपा प्रवक्ते संतोषजी पांडागळे तसेच विविध क्षेत्रांतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे सामाजिक ऐक्य,रक्तदान व अन्नदान यांसारख्या महान कार्यांची पेरणी करून,आपण महात्मा बसवेश्वरयांच्या विचारांचा जागर केला. त्यांचे “कायम सत्य – सेवा,समता आणि सदाचार” हे तत्त्व आजही समाजाला दिशा देत आहे.

जय बसवेश्वर! समतेचा जयघोष अखंड नांदावा! असे राज्यसभा खासदार डॉ.अजितजी गोपछडे यांनी सांगितले आहे.

Share This Article
error: Content is protected !!