संजीवकुमार गायकवाड यांना कोल्हापूरी राज्यस्तरीय आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

जिल्हा प्रतिनिधी/राहूल कोलते 

नांदेड – जिल्यातील धर्माबाद तालुक्या मधील निर्भीड लेखणीचा सरताज बादशहा रोखठोक पत्रकार संजीवकुमार एस गायकवाड यांना “युवा क्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य प्रेरिते ता.करविर जिल्हा कोल्हापूर च्या वतीने २०२५ चा राज्यस्तरीय जनसेवा आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार अनेक दिग्गज मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

आयोजक “युवा क्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य परिते ता.करविर जि.कोल्हापुर यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य पुरस्कार सोहळा दि.४ मे रोजी प्रसिद्ध समाजसेवक,समाजसेविका,
अभिनेत्री,लेखक,गायक,गायिका शिक्षक हिरकणी अश्या मान्यवरांच्या पुरस्कारार्थीना दि.४ मे २०२५ रोजी परिते ता.करविर जिल्हा कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आला येणार आहे.

युवा क्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्था हि अनेक गोरगरीब गरजूंना मदत सतत,करत असतात कोरोनाच्या महामारीत अन्न धान्य,किराणा सामान, कपडे,औषध उपचार करण्यात मदत केली,परिते परिसरातील अडीअडचणीत पाणी टंचाई, दुष्काळग्रस्ताना मदत अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम हि युवा क्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्था कामे केली व सतत करत असतात.या पुरस्कार कार्यक्रमास अनेक मंत्री महोदय दिग्गज कलाकार दिग्दर्शक उद्योजक राजकीय अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत राहणार आहेत.

संजीवकुमार गायकवाड यांना पत्रकारीता क्षेत्रामधील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला असून त्यांना यापूर्वीही मातोश्री रमाबाई आंबेडकर सामाजिक सेवाभावीसंस्था बेटमोगरा यांच्या वतीने, मायडी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था म. रा. यांच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य अहमदनगर यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात ही आले आसून कोरोना काळात ही ते घरी नं बसता रुग्णांची सेवा इजी.हर्जिंदर संधूयांच्या सोबत गुरुद्वारा मार्फत दिल्या जाणाऱ्या लंगर सेवामध्ये हिरहिरीने सहभाग घेऊन जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून नांदेड बस्थानक रेल्वे स्टेशनं शहरातील रस्त्यावर राहणारी बेघर लोकांन परेंत अन्न पोहचता करण्याचे काम केले असल्यामुळे त्यांना कोरोना योद्धा म्हणून सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कारांनी सन्मानित मा.श्री.संजीवकुमार सोपानराव गायकवाड पत्रकार तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा नांदेड जिल्हाध्यक्ष,दै,वीशिरोमणी विभागीय संपादक,दै.हिंदू सम्राट जिल्हा प्रतिनिधी,सांज दै.लोकदिशा नांदेड जिल्हा प्रतिनिधी,सामाजिक संघटना आंबेडकरवादी सेनेचा नांदेड जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते असून ते एस कुमार ग्रुप चे चेअरमन सुद्धा आहेत.

त्यांना सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असल्यामुळे
ते संस्थे मार्फत पोलीस भरती लेखी सराव परीक्षा,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,मोफत डोळे तपासणी शिबिर,रक्तदान शिबीर,वृक्षारोपण,पेंटींग कारागीर शिबिर,समाजातील घटकांना शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचवणे, महिलांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण,सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण,तज्ञ व्यक्ती व्याख्याने, निरनिराळ्या मोर्चा आंदोलन यामध्ये सहभागी,सर्वच महापुरुषांच्या जयंती साजरी केली जाते,गावातील सर्व सण उत्सव यात्रा यांमध्ये पाणी वाटप,खिचडी वाटप,सहभागी असे कितीतरी समाज उपयोगी विधायक उपक्रम व समाजासाठी योगदान दिले आहे.

या पुरस्कारांनी त्यांना नवीन कामं करण्याची उर्जा दिली आहे भविष्यात यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य केले जाईल फक्त आपणा सर्वांचा शुभ आशिर्वाद व प्रेम असंच कायम राहूदे. राज्यस्तरीय पत्रकारीता सामाजिक,विविध क्षेत्रातील आतापर्यंत ५८ पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श व्यक्तीला विविध पुरस्काराने,विविध व्यक्तींना राज्यस्तरीय हा पुरस्कार दिला जातो.

यामध्ये राज्यस्तरीय पत्रकारिता,शैक्षणिक, सामाजिक,राजकीय,पत्रकार यांना हा ‘मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा’ हा राज्यस्तरीय जनसेवा आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कार २०२५ चा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्हातील शिक्षक वृंद,राजकीय पक्ष पत्रकार बांधव माझ्या कुटुंबासह मित्र परिवार सर्व स्थरातून त्यांच्या कौतुकाचा वर्षांव होत आहे.

Share This Article
error: Content is protected !!