उपक्रमशील शिक्षीका जयश्री सूर्यवंशी यांना ‘नवोपक्रम’ पुरस्कार प्रदान !

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 

माहूर तालुका प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी

माहूर : राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2024-2025 मध्ये माहूर तालुक्यातील अती दुर्गम क्षेत्रात मोडणा-या प्रा. शाळा लिंबायत (जुने) या शाळेच्या उपक्रमशील शिक्षीका जयश्री विजयसिंह सुर्यवंशी (वर्मा) यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकाविला आहे, तसेच शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्माती स्पर्धा- 2023-2024मध्ये उत्कृष्ठ व्हिडीओ निर्मीती करीता इंग्रजी विषयात दोन गटात प्रथम क्रमांक, गणित विषयात प्रथम क्रमांक, विज्ञान विषयात प्रथम क्रमांक(तालुकास्तर)पटकाविला आहे. दि.29 एप्रिल 2025 रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड येथे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित कार्यक्रमात दिलीप बनसोडे (शिक्षणाधिकारी योजना), माधव सलगर (शिक्षणाधिकारी माध्य), सुदर्शन चिटकुलवार ( प्राचार्य डाएट), संतोष साखरे (अधिव्याख्याता), प्रकाश शिरसे (व्हिडीओ निर्मीती विभागप्रमुख) यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक वि‌द्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात याच बरोबर नवोपक्रम शिक्षक विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी नवन‌वीन उपक्रम तसेच कल्पनांचा वापर करत असतात. त्यांनी राबविलेलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी तसेच सर्वच स्तरातील शिक्षक यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2024-2025 घेण्यात आली.त्यात माहूर तालुक्यातील अती दुर्गम क्षेत्रात मोडणाऱ्या प्रा. शाळा लिंबायत (जुने) या शाळेच्या उपक्रमशील शिक्षीका जयश्री विजयसिंह सुर्यवंशी (वर्मा) यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकाविला आहे, तसेच शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्माती स्पर्धा- 2023-2024मध्ये उत्कृष्ठ व्हिडीओ निर्मीती करीता इंग्रजी विषयात दोन गटात प्रथम क्रमांक, गणित विषयात प्रथम क्रमांक, विज्ञान विषयात प्रथम क्रमांक (तालुकास्तर) पटकाविला आहे तर माहूर तालुक्यातील दुर्गम क्षेत्रातील प्रा. शाळा सातघरी येथील उपक्रमशील शिक्षक रणजीत दत्त वर्मा यांना दर्जेदार व्हिडीओ निमीती स्पर्धेत भाषा विषयात प्रथम क्रमांक, परिसर अभ्याच विषयात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. लिंबायत (जुने) शाळेचे शिक्षक जितेंद्र दत्त वर्मा यांना ही या स्पर्धेत पुरस्कार प्राप्त झाला असून 

दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड येथे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित कार्यक्रमातदिलीप बनसोडे (शिक्षणाधिकारी योजना), माधव सलगर (शिक्षणाधिकारी माध्य), सुदर्शन चिटकुलवार ( प्राचार्य डाएट), संतोष साखरे (अधिव्याख्याता), प्रकाश शिरसे (व्हिडीओ निर्मीती विभागप्रमुख) यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. या पुरस्काराने माहूर सारख्या आदिवासी बहुल दुर्गम डोंगराळ मागासलेल्या तालुक्याच्या विशेषतः माहूर शहराच्या शिक्षणक्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

     वर्मा कुटुंबातील या शिक्षक त्रयींचे शिक्षण क्षेत्रातील योगदान नेहमीच स्तूत्य राहिले असून पुरस्कार प्राप्तीसाठी तसेच पुढील नवोपक्रमांसाठी कृष्णा भराडीया (ग.शि.अ. माहूर), शेषराव संभाजीराव पाटील (तालुकाध्यक्ष, म.रा. शिक्षण परिषद), अरविंद जाधव (तालुकाध्यक्ष शिक्षक भारती), स्वरुपा दुबे, वंदना लोकडे, अर्चना आरेकर (गिऱ्हे), गौरव जयस्वाल, अजय पोपुलवार डॉ. अभिजीत अंबेकर, गजानन गोडसे, केंद्र प्रमुख अजय राठोड यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Share This Article
error: Content is protected !!