नांदेड जिल्हा प्रतिनिधि:संजीवकुमार गायकवाड
नांदेड –जिल्यातील धर्माबाद व बिलोली तालुक्यात अवैध रेतीचे उत्खनन जोमात सुरू असून ही अधिकार्या कडून जाणीवपूर्वक महाराष्ट्र शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असताना देखील महसूल प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने रेती माफियांना अभय निर्माण झाले आहे.
तालुक्यातील नागनी,हुनगुंदा गोदावरी नदी पात्रातून रात्री बेरात्री अवैध रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. बिलोली -धर्माबाद तालुक्यात विक्री करण्यासाठी रात्री गाड्या भरून येत आहेत.
दैनिक हिंदुसम्राट प्रतिनिधि रिपोटींग करण्यासाठी गेले असता अवैध रेती उत्खनन करणारे टोळी हायवे रोडवरच रेती टाटा हायवा गाडीतून रिकामी करून रेती हायवे रोडवरच टाकल्यामुळे जीव कोणाचे ही गेले तरी चालेल पण रेतीची गाडी मात्र वाचली पाहिजे अशी दृष्ट विचारसरणी रेती माफियाची आहे.
अशी चर्चा परिसरातील नागरिकात होता आहे. नदीपात्रात मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत.
परिसरातुन तालुक्यातून एकमेव गोदावरी नदी वाहते.या नदीमध्ये पाच ते २५ फूट खोल रेतीसाठा करण्यात येत आहे. परंतु महसूल खात्याचे काही अधिकारी मलिदा गोळा करण्यात व्यस्त असल्याने गोदावरी नदीपात्रातूनही अवैध रेती उत्खननाला पेव फुटले आहे.
रेती ठेकेदारांवर राजकीय कृपाछत्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी वाढली असून,खुलेआम अवैध रेतीची वाहतूक केली जात होती. यामुळे शासनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे.
रात्रीच्यावेळी अवैध रेतीची तस्करी करण्याकरीता विना नंबर प्लेट वाहनाचा उपयोग रेती माफिया करीत आहेत. या प्रकाराला वेळीच आळा घालण्यासाठी वरिष्ठांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
रात्रीची रेती चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. महसूल विभागाने रेती तस्करांवर आळा घालण्यासाठी गत काही महिन्यांपूर्वी बिलोली येथे रेती चे वाहन जप्त करुन कारवाई केली होती परंतु पुन्हा अवैधरीत्या रेतीचे उत्खनन जोमात सुरू झाले आहे.
तहसीलदार,उपविभागीय अधिकारी सह पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेती वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. दिवसाच्या सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेव्यतिरिक्त नदीपात्रात दोन मीटरपेक्षा जास्त वाळू उपसा करण्यास मनाई असतानाही,तसे न होता येथे सर्रास नियमाला मूठमाती दिल्या जात आहे.आणि रात्री बेरात्री रेती चोरीकरून वाहतूक होत आहे.