कै.नारायणराव चिद्रावार व माझे आजोबा कै.मा.आमदार बळवंतराव चव्हाण यांचे घनिष्ठ संबंध होते.-खा.रविंद्र वसंतराव चव्हाण
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड :दि.३. कै.नारायणराव स्मृती व्याख्यानमाला देगलूर (वर्ष 39वे) या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्ह्याचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण साहेब मनोगत व्यक्त करत असताना आज राजकारणाची पातळी अतिशय खालच्या दर्जाची झाली आहे यामुळे लोकशाही धोक्यात येईल की काय अशी भीती वाटत असताना लोकशाही बळकट करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन कै.नारायणराव स्मृति व्याख्यानमालेच्या लोकशाही आणि सामाजिक परिवर्तन या विषयाला अनुसरून त्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास आमदार जितेश अंतापूरकर,व्याख्याते माझी कुलगुरू डॉ.सुधीर गव्हाणे, लक्ष्मीकांत पदमवार, काजीआली साहेब,बसवराज पाटील वन्नाळीकर,किरण चिद्रावार, प्रकाश ढेंबरेकर, प्रकाश चिद्रवार गुरुराज चिद्रावार,अरुण चिद्रावार, साईनाथ सावकार मेडेवार, बालाजी पाटील थडके नितेश पाटील,सय्यद सर,कैलास येसगे,डॉ.मुजिफ डॉ.राजू लाडके,हाफिज पठाण,समीरभाई,राजू पाटील लछनकर,माधव हानेगवे,त्यास चिद्रावर परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते