माहूर पोलिसांची जबरदस्त कामगिरी
श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी/
माहूर तालुक्यातील मौजे रुई येथे देशमुख कुटुंबातील सख्या चुलत भावाचा दोघा भावंडांनी शेतीच्या वादातून केल्याची घटना दि 8 8 2024 रोजी घडली होती या घटनेतील एका आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली होती तर एक आरोपी फरार झाला होता पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नी शिवप्रकाश मुळे पोउपनी संदीप अनेबोईनवाड यांचे सह पोलिसांनी तेलंगणातून दि 2 रोजी अटक केल्याने पोलिसांच्या या जबरदस्त कामगिरीचे अभिनंदन होत आहे
माहूर तालुक्यातील मौजे रुई येथे दिनांक 18 8 2024 रोजी देशमुख कुटुंबियांच्या शेतीच्या वादावरून बैठक बोलावण्यात आली होती यामध्ये गावातील सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील यांचे सह सर्व गावकरी उपस्थित होते यांच्या समक्ष वाद निपटवण्यात आला होता परंतु राहील बबलू देशमुख आणि सोहेल बबलू देशमुख यांनी वाद निपटल्यानंतर परवेज पंटुष देशमुख याला धरून सर्व गावकऱ्या समक्ष विळ्याने सपासप वार करून त्याचा निर्गुण खून केल्याची घटना घडली होती पोलिसांनी राहील बबलू देशमुख यास अटक केली तर सोहेल बबलू देशमुख हा आठ महिन्यापासून फरार होता परवेजचे वडील फंटूश देशमुख यांनी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी ऊमाप आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची भेट घेऊन आरोपीच्या नातलगाकडून धमक्या येत असल्याने फरार आरोपीस अटक करण्याची मागणी केली होती
पंटूश देशमुख यांच्या मागणीची दखल घेत सपोनी शिवप्रकाश मुळे यांनी खबऱ्यामार्फत लपून असलेल्या सोहेल देशमुख यास दि 2 रोजी तेलंगणातील संगारेड्डी जिल्हा मणिपूर येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली या कारवाईत सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संदीप अनेबोईनवाड जमादार प्रकाश गेडाम पो का डी डी खंडाळे यांनी मोलाची कामगिरी बजावली