तख्त सचखंड श्री हजुर अबिचलनगर साहिब,नांदेड येथे ६९ वां सामुहिक विवाह मेळावा संपन्न

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

गुरुद्वारा बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना ०९ टक्के महागाई भत्ता मंजूर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – दि.३.गुरुद्वारा बोर्ड,तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब,नांदेड च्या वतीने आयोजित ६९ वा सामुहिक विवाह मेळावा आज दि.०१/०५/२०२५ रोजी हर्षोल्लासाने माननिय सिंघ साहिब संत बाबा कुलवंत सिंघ जी जत्थेदार व समस्त पंजप्यारे साहिबान यांच्या सरप्रस्तीमध्ये व डॉ.स.विजय सतबिर सिंघ जी प्रशासक साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये संपन्न झाले.या विवाह मेळाव्यात १० जोडप्यांचे विवाह संपन्न झाले.

यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक साहेबांनी व्हिडीओ कॉन्फरान्सिंग द्वारे आपले विचार व्यक्त करतांना नवदाम्पत्याना शुभेच्छा दिल्या तसेच या वेळी सामाजिक कार्य चालू राहतील आणि बोर्डातर्फे शैक्षणिक,वैद्यकिय आणि यात्रेकरूंसाठी अनेक सुविधा उपलब्ध करण्याचे उपक्रम चालू राहतील जेणे करुन यात्रेकरूंना जास्तीत-जास्त सहुलत मिळावी याची दक्षता घेण्यात येईल असे सांगीतले. यावेळी गुरुद्वारा बोर्डाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अहोरात्र मेहनत घेऊन विविध सोहळे व कार्यक्रम तसेच हा ६९ वा सामुहिक विवाह महोत्सव संपन्न करण्यासाठी परिश्रम घेतले व हा महोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला त्याकरीता कर्मचाऱ्यांचे आणि सर्व संगत चे आभार मानले. कर्मचाऱ्याऱ्यांना ०९ टक्के महागाई भत्यात वाढ करण्याचे घोषीत केले यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन सर्व कर्मचाऱ्याऱ्यांनी माननिय प्रशासक डॉ.विजय सतबीर सिंघ जी यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी पंजप्यारे साहिबान यांच्या वतीने आदरणिय मीत जत्थेदार सिंघ साहिब भाई ज्योतिंदर सिंघ जी यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त करुन ७० व्या सामुहिक विवाह मेळावा २९ आणि ३० नोव्हेम्बर २०२५ रोजी संपन्न होईल असे घोषीत केले.याच वेळी गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक स. गुरुबचन सिंघ यांनीही नवदाम्पत्याना आपल्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी माननिय सिंघ साहिब संत बाबा कुलवंत सिंघ जी जत्थेदार तथा समस्त पंजप्यारे साहिबान,संत बाबा बलविंदर सिंघ जी,तसेच समाजातील गणमान्य व्याक्ति,गुरुद्वारा बोर्डाचे माजी पदाधिकारी, सदस्य व सामाजिक कार्यकर्ते इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती. 

या कार्यक्राला यशस्वी करण्यासाठी गुरुद्वारा बोर्डाचे सर्व सहा.अधिक्षक स.हरजीत सिंघ कडेवाले,स.रविंद्र सिंघ कपूर,स.बलविंदर सिंघ फौजी, स. जयमल सिंघ ढिल्लों व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम केले.तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स.शरणसिंघ सोढी वरिष्ठ सहा.अधिक्षक यांनी केले.अशी माहिती अधिक्षक गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड,नांदेड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

Share This Article
error: Content is protected !!