नांदेड प्रतिनिधी /अशोक वाघमारे
नांदेड – जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा तालुका नांदेड केंद्रांतर्गत महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत फेब्रुवारी-२०२५ मध्ये घेण्यात आलेल्या पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत १४ विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र भरलेले होते. त्या पैकी ९ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या नऊ विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव उंचावल्याने शिक्षण विस्तार अधिकारी लता कवठेकर व केंद्रप्रमुख घोडसकर यांनी त्यांचा सत्कार करून बक्षीस दिले. विद्यार्थ्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सुनीता मोखंडपल्ले, शाळेचे मुख्याध्यापक आर .आर .कुलकर्णी यांचे शिक्षण विस्तार अधिकारी लता कौठेकर, केंद्र प्रमुख घोडसकर व पालकांनी अभिनंदन केले.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा येथील नऊ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याने या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.