तीर्थक्षेत्र माहूर ची पेयजल समस्या लवकरच मार्गी लागणार!
श्रीक्षेत्र माहूर/ प्रतिनिधी
माहूर – पैनगंगेवरील सात उच्च पातळी बंधारे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृपेने मंजूर झाले.या साठी मी २०१८ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या कडे त्या नंतर उद्धव जी ठाकरे यांच्या कडे पाठपुरावा केला.त्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये हिवाळी अधिवेशनात पैनगंगा उच्चपातळी बंधाऱ्या संदर्भात मुख्य सचिव दीपक कपूर यांच्या कक्षात बैठक होऊन तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात हा विषय मार्गी लावला आहे. एकनाथ शिंदे यांचे आशीर्वादानेच पैंनगंगेवरील सात उच्च पातळी बंधारे मंजूर झाले असे मत मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा, महाराष्ट्र राज्य) तथा विधान परिषद सदस्य हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्याचा ६६ वा स्थापना दिवस समारंभाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण आ.हेमंत पाटील यांच्या हस्ते तहसील कार्यालयात संपन्न झाले.त्या नंतर हेमंत पाटील यांनी श्री रेणुका देवी गडावरील कामाची पाहणी केली व बांधकाम विभागाचे उपअभियंता डी.के. भिसे,अभियंता रवींद्र उमाडे, कुणाल यादव यांच्या कडून माहिती जाणून घेतली या वेळी तहसीलदार किशोर यादव,नगराध्यक्ष फिरोज दोसानी,यांची उपस्थिती होती.त्या नंतर
प्रस्तावीत माहुर (धनोडा) उच्च पातळी बंधाऱ्याच्या ठिकाणी पैनगंगा नदीवर प्रत्यक्ष जाऊन पाहणी करत सुरू असलेल्या कामावर समाधान व्यक्त करत धनोडा पैनगंगा नदीवर उच्च पातळी बंदरा होत असल्याचे बघून आनंद झाला, हे काम पूर्ण झाल्यानंतर विदर्भानी मराठवाडा या दोन्ही बाजूच्या एक लाखावर शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून विशेष म्हणजे तीर्थक्षेत्राच्या माहूर शहराला पिण्याच्या पाण्याची कमतरता पडणार नाही. पैनगंगेवरील उच्च पातळी बंधारे खासदारकीच्या माझ्या कार्यकाळातील महत्त्वाची स्वप्न पूर्ण होत असल्याचा देखील आनंद आहे असे सांगत लवकरच या कामाच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना माहूर येथे आणणार असल्याचेही हेमंत पाटील यांनी सांगितले.या वेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी,कार्यकारी अभियंता शेख,अभियंता शिऊर,शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, लांजी चे सरपंच मारोती रेकुलवार,अमित येवतीकर, ज्येष्ठ कार्यकर्ते विनायकराव देशमुख, हिरासिंग चव्हाण, हनुमंतराव मुंडे,संजय जोशी, विशाल चव्हान, अरविंद जयस्वाल, विकास कपाटे, गोपाल नाईक यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी अधिकारी, समाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शहरातील मान्यवर, उपस्थित होते.