नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे
नायगाव – शासना मार्फत नायगाव, उमरी, धर्माबाद, तालुक्यात वाळूचा कुठलाच धक्का सुटला नसताना अटाळा व उमरी येथील काही चोरटे वाळू माफिया नायगाव, बिलोली तालुक्यातून मात्र दररोज रात्री बोटीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करत आहेत. आर्थिक लाभापोटी संबंधित महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाही.
अटाळा व उमरी येथील काही चोरटे वाळू माफिया नायगाव तालुक्यातील राहेर व बिलोली तालुक्यातील कोळगाव येथील गोदावरी नदी पात्रातून बोटीच्या सहाय्याने दररोज रात्री पाच ते सहा सक्शन पंप, तराफा व बोटीच्या सहाय्याने हजारो ब्रास वाळू उपसा करून उमरी ,भोकर, धर्माबाद तालुक्यात मोठ मोठ्या हायवा टिपर ने ते भरदिवसा विक्री करून उच्छांद मांडला आहे. दरमहा ठरलेल्या प्रमाणे आर्थिक लाभापोटी तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, बिट जमादार, पोलीस निरीक्षक यांनी जानीव पुर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. याबाबत अनेकांनी तोंडी व लेखी तक्रार देऊन ही कारवाई होताना दिसून येत नाही. उलट त्या वाळू माफियांच्या विरोधात कुणी तक्रार दिली तर महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने वाळू माफियांना तुमच्या विरोधात तक्रार आली आहे. त्यांच काय ते बघून घ्या अशा सुचना वाळू माफियांना देत असल्याने ते माफिया तक्रार करत्यांना धमक्या देण्याचे प्रमाण वाढले आहे. तेव्हा जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी वेळीच लक्ष घालून या महसूल विभाव व पोलीस प्रशासनाची होणारी बदनामी व अटाळा येथे रात्री अवैध वाळू चोरी करणाऱ्या माफियांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व सामान्य जनतेतून जोर धरत आहे.
===========चौकट============
विशेष पोलीस उप महानिरीक्षक यांची पथके भूमिगत ?
————————————–
नांदेड कार्यक्षेत्रातील अवैध धंद्यावर धडक कार्यवाही करण्यासाठी विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी खास पथके तयार केली होती. मागील काही महिन्यात या पथकांनी केलेल्या धाडसी कारवायांचे जनतेतून स्वागतही झाले. पण १ मे पासून नेमलेले नवीन पथक धर्माबाद तालुक्यात आहे का नाही हेच कळायला मार्ग नाही. धर्माबाद तालुक्यातील अटाळा येथे आजघडीला वाळूचे अवैध सिंडिकेट व बेफाम वाळू चोरी बिनधास्त सुरु आहे. शासनाला लाखोंचा चुना लागत असतानाही याकडे स्थानिक महसूल व पोलीस विभागाची अर्थपूर्ण डोळेझाक स्पष्टपने दिसून येत असताना किमान विशेष पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड यांचे पथक तरी धर्माबाद, बिलोली तालुक्यातील गोदापट्यातील वाळू तस्करावर कारवाई करून वाळूच्या अवैध तस्करीवर लगाम लावेल काय ? असा प्रश्न या भागातील जनतेतून व्यक्त होत आहे.