नमस्ते नांदेड डिजीटल मिडियातील नांदेडचा चेहरा बनावा – पालकमंत्री अतूल सावे 

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड प्रतिनीधी/हरजिंदर सिंघ संधू 

नांदेड मुद्रित प्रसार माध्यमांचे महत्व जरी अबाधित असले तरी युवापिढीचा कल मात्र आता डिजीटल मिडियाकडे अधिक वाढला आहे. कमी काळात जास्त लोकांपर्यंत पोंहचण्याचे एक महत्वाचे साधन म्हणून याकडे पाहिल्या जाते. नांदेडमध्ये केवळ एकवर्षापूर्वी सुरु झालेल्या नमस्ते नांदेड या इंस्टाग्राम पेजने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आगामी काळात नमस्ते नांदेड हा नांदेड जिल्ह्यातील डिजीटल मिडीयाचा चेहरा बनावा अशी अपेक्षा जिल्ह्याचे पालकमंत्री अतूल सावे यांनी व्यक्त केली.

      दै.सत्यप्रभा या संस्थेशी संलग्न असलेल्या नमस्ते नांदेड डिजीटल मिडिया प्लॅटफार्मच्या कार्यालयाचे उद्घाटन ना.सावे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून खा.डॉ.अजित गोपछडे, आ.जितेश अंतापूरकर, आ.श्रीजया चव्हाण, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, माजी आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची प्रमुख उपस्थिती होती.

    नमस्ते नांदेडच्या इंस्टग्राम पेजने अल्पावधीतच दोन लाख फालोअर्सचा आकडा पूर्ण केला आहे. या पार्श्‍वभूमीवर कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यातच मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी भोकरच्या आ.श्रीजयाताई चव्हाण यांनी आपल्या भाषणातून युवापिढीच्या अपेक्षा व त्यासाठी समाजातील सर्वच महत्वपूर्ण घटकांनी द्यावयाचे योगदान यावर भाष्य करतांनाच भविष्याचा वेध घेत नमस्ते नांदेडने आपली उत्तुंग भरारी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

    यावेळी दै.सत्यप्रभाचे संपादक संतोष पांडागळे यांनी दै.सत्यप्रभा व नमस्ते नांदेडच्या वाटचाली संदर्भात आपल्या प्रास्ताविकांमधून माहिती सांगितली. यावेळी दिलीप कंदकुर्ते, सतीश सामते, एकनाथ पवार, डॉ.अंकुश देवसरकर, देविदास राठोड, श्रावण भिलवंडे, चैतन्यबापू देशमुख, प्रविण साले, बाळू खोमणे, विजय गंभीरे, ओमप्रकाश गिल्डा, कमल कोठारी, सतीश माहेश्‍वरी, माधवराव एकलारे, नौनिहालसिंघ जहागिरदार,प्रा.कैलास दाड, मोहनसिंग तौर, व्यंकटेश साठे, आशिष नेरलकर, साहेबराव गायकवाड, साहित्यिक डॉ.राम वाघमारे, विनायक सगर, संभाजी बिराजदार, गंगाधर जाधव, साहेबराव मावले, संतोष सूर्यवंशी, शशीकांत क्षीरसागर, संगमेश्‍वर बाचे, दिलीप पाटील, विपुल मोळगे,हरजिंदर सिंघ संधू आदिंची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी दै.सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे, संचालक बालाजी जाव,संदीप पाटील, सल्लागार मनोहर आयलाने, नमस्ते नांदेडचे राजू गिरी, सत्यप्रभाचे वृत्त संपादक राजेश शिंदे यांनी परिश्रम घेतले.

Share This Article
error: Content is protected !!