आदमपुर ग्रामपंचायती मध्ये तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करुण केला होता अपहार..माहिती अधिकार कार्यकर्ता शेख
जाकीर शेख सगीर यांनी न्यायालयात मागीतली होती दाद
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – जिल्यातील तालुक्यातील बिलोली तालुक्या मधील मौजे आदमपुर येथील ग्रामपंचायत कार्यालयात तत्कालीन सरपंच सौ.पुजा नारायण चिंतले आणि ग्रामसेवक एस.एन.ताडकोले यांनी संगनमत करुन कागदोपत्री कामे दाखवुन ११ लाख १ हजार ९७ रु.एवढा शासकीय निधी चा अपहार केला होता या प्रकरणी तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता शेख जाकीर शेख सगीर यांनी न्यायालयात अर्ज केला असता न्यायालयाने तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर दि.५ मे रोजी भारतीय दंड विधानाच्या कलम ४२० ४६५ ४६७ ४६८ ४७१ ३४ अन्वये रामतिर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मौ.आदमपुर ग्रामपंचायतीमध्ये सन २०१७- ते २०२० या कालावधीत केंद्रशासनाच्या चौदाव्यावित्त आयोगातुन तसेच राज्य शासनाच्या विविध योजनेतील कामात तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करुण कट कारस्थान रचुन कागदोपत्री विकास काम दाखवुन भ्रष्ठाचार केल्या संदर्भात गावात तक्रारी झाल्या तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समिती बिलोली यांनी विषयानुसार चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली ज्यामध्ये विस्तार अधिकारी पंचायत,विस्तार अधिकारी कृषी, शाखा अभियंता बांधकाम,कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा नायगाव, या चौकशी समितीने आदमपुर गावी जाऊन प्रत्यक्ष कामाची अभिलेखा ची पडताळणी केली.ज्यामध्ये १४ वा वित्त आयोगा निधीतुन,वाटर फिल्टर,पाणी पुरवठा पाईप लाईन दुरूस्ती, सी.सी. रस्ता व नाली बांधकाम,अंगणवाडी दुरुस्ती, शाळा दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य साहित्य,विद्युत दिवे बसविणे, मुरूम टाकणे, शौचालय बांधकाम,आशा किट खरेदी,अशा विविध कामांची चौकशी केली असता ११ लाख १ हजार ९७ रुपयांचा अपहार अपहार झाल्याचा सिध्द होवुन तत्कालीन ग्रामसेवक ताडकोले यांना निलंबीत करण्यात आल होत.पण त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही करण्यात आली नाही.
पंचायत समिती च्या चौकशी अहवालानुसार शासकीय निधीचा अपहार करणारे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी शासनाच्या निधीची नियोजनबध्द विल्हेवाट लावली या विषयी चौकशी अहवाल घेवुन मा.जिल्हाअधिकारी नांदेड यांच्याकडे फौजदारी प्रक्रीयासंहितेचे कलम १९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची परवानगी माहिती अधिकार कार्यकर्ते शेख जाकीर यांनी मागीतली आहे ९० दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात दाद मागुन गुन्हा दाखल करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला होता. तरीही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे शेख जाकीर शेख सगीर व यांचे अभिवक्त एडवोकेट एडी लाडे,तिडके व वानखेडे यांनी न्यायालयात बाजू मांडली होती या विषयाची दाद मागीतली असता न्यायालयाने संपुर्ण कागदपत्र अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यावरुन रामतिर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.