श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी/
माहूर – तालुक्यातील मछिंद्र पार्डी येथील जल जिवन मिशन अतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम पुर्ण झाले नसल्याने गावकऱ्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे तर एकाच बोर वरून संपूर्ण गाव पाणी भरत असल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे सदरील पाणी पुरवठा योजनेचे सध्या बंद असलेले काम तात्काळ सुरू करून काम पुर्ण होईपर्यंत कोणतेही देवक ग्रामपंचायतीच्या परवानगी शिवाय काढू नये तसेच आठ दिवसात काम सुरू होत नसेल तर संबंधीत कत्राटदाराचे कंत्राट रद्द करून नवीन कत्राटदारास काम देऊन काम पुर्ण करुन देणे बाबत अन्यथा ग्रामपचायत कार्यकारणी व मौजे मच्छिद्र पार्डी येथील गावकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले परंतु अद्यापही त्याची दखल झाली नसल्याने गावकऱ्यातून संताप व्यक्त होत आहे
माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पार्डी च्या सरपंच सौ. जयश्री प्रकाश वाढवे व इतर 7 सदस्य ग्रा.पं. मच्छिद पार्डी ग्रा.प.मछिद्र पार्डी ता. माहूर यांनी येथील जल जिवन मिशन अंतर्गत याणी पुरवठा योजनेचे काम अदयाप पूर्ण झाले नसल्याने सदरील पाणी पुरवठा योजनेचे सध्या बंद असलेले काम तात्काळ सुरू करुन काम पूर्ण करणे व कामाचे कोणतेही देयक ग्रामपंचायतीच्या परवानगी शिवाय न काढणे. आठ दिवसात काम सुरू होत नसेल तर सबंधीत कंत्राटदार कंत्राट रद्द करुन नवीन कंत्राटदारास काम देऊन काम पुर्ण करून देणे अन्यथा ग्रामपंचायत कार्यकारणी व मौजे मच्छिंद्र पार्डी ता.माहूर जि. नांदेड येथील नागरीकाच्या बतीने जन आदोलन करनार असल्याचे निवेदन सर्व संबंधितांना देण्यात आले होते सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याकडून गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांना तत्काळ कारवाई करण्यासाठी उलट टपाली पत्र देण्यात आले परंतु आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही
त्यामुळे एकाच कुप नलिकेवरून पूर्ण गाव पाणी भरत असून एका किलोमीटर पेक्षा जवळ कुठलीही विहीर नसल्याने कुपनलिका आटली किंवा मोटर जळली तर संपूर्ण गावाला हंडाभर पाण्यासाठी किलोमीटर प्रवास करून पाणी आणावे लागेल त्यामुळे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य गावकऱ्यांनी आंदोलन करण्याआधी तत्काळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करून सर्व नागरिकांना नळाद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे