श्रीक्षेत्र माहूर/प्रतिनिधी
माहूर – शहरासह जिल्हाभर आपल्या सामाजिक कार्यामुळे प्रसिद्ध असलेल्या माहूर शहरातील रणरागिणी सौ पद्माताई जयंत गिऱ्हे यांची माळी सेवा संघाच्या महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांना पुणे येथील कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्याने माहूर शहरासह नांदेड जिल्हा भरातून त्यांचे अभिनंदन होत आहे
माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारणी 25 एप्रिल रोजी दत्ताभाऊ माळी यांनी जाहीर केली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये माळी सेवा संघ म्हणून कार्यरत असणारी माळी समाजाची अग्रगण्य संघटणा असून या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ माळी असून त्यांनी प्रदेश कार्यकारणी महाराष्ट्र राज्य जाहीर केली असून माळी सेवा संघ ही संघटना प्रत्येक तीन वर्षानंतर बदलण्यात येते माळी सेवा संघाच्या आधारस्तंभ रुपालीताई चाकणकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिलाआयोग राज्यमंत्री दर्जा यांच्या आशीर्वादाने व माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ माळी यांनी पुणे येथे एका कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळीप्रमुख पाहुणे म्हणून संतोष दादा बोराटे यांच्या हस्ते उपस्थित पदाधिकाऱ्या सोबत सौ पद्माताई जयंत गिऱ्हे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व माळी सेवा संघ महिला आघाडी च्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी येथील समाज बांधवासह नागरिकांनी पद्माताई गिऱ्हे यांची निवड झाल्याबद्दल जोरदार स्वागत करण्यात आले पुढील वाटचालीस मित्र परिवार यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.