माहूर तालुका प्रतिनिधी/ बजरंगसिंह हजारी
माहूर – दि.१० मे माहूर येथील आनंद दत्तधाम मठाचे मठाधिपती ज्यांची नुकतीच राज्य सरकारने महाराष्ट्र शासनाचे स्च्छता दूत म्हणून नियुक्ती केलेली आहे त्याच सुप्रसिद्ध आश्रमाचे सरव्यवस्थापक तथा प्रवक्ते प्रतिष्ठित नागरिक भाऊ पाटील हडसणीकर यांची नात
यवतमाळ येथील पी.वाधवाणी फार्मसी महाविद्यालयातील एम. फार्म फार्माकोलॉजी या अभ्यासक्रमातील विद्यार्थिनी आकांक्षा गंगाधर लुंगारे हिची सायनोस हेल्थ प्रा. लिमिटेड, पुणे येथे निवड झाली आहे. तिला पाच लाखांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. या यशाबद्दल तीचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या डिजिटल स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना नोकरी मिळणे अतिशय कठीण झाले आहे. परंतु पी. वाधवाणी फार्मसी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी सतत प्रयत्नशील असते. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध नामांकित कंपनीचे प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येते. यंदा आयोजित प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये कॉलेजची आकांक्षा लुंगारे हिची नामांकित कंपनीत निवड झाली आहे. या यशासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चांदेवार यांच्या मार्गदर्शनात प्लेसमेंट सेलप्रमुख प्रा. परेश वाधवाणी, फार्माकोलॉजी विभाग प्रमुख डॉ. नितीन कोचर, संशोधक मार्गदर्शक डॉ. अभिजीत श्रीराव व डॉ. दीपक मोहाळे यांनी मार्गदर्शन केले.
विशेष म्हणजे यशस्विता आकांधा पाटील ही माहूर येथील आनंद दत्तधाम मठाचे मठाधिपती तथा महाराष्ट्र शासनाचे स्च्छता दूत साईनाथ महाराज यांचे मुळ गाव बितनाळ ता. भोकर जिल्हा नांदेड येथील येथील रहिवासी असून, माहूर येथील आपले आजोबा भाऊ पाटील हडसणीकर यांच्या कडे राहत असताना तिला साईनाथ महाराज यांच्या उपक्रमशिलतेतून आनंद दत्तधाम मठाच्या वतीने वेळोवेळी आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण अशा शिक्षण परिषदेचा अभ्यासासाठी मोठा लाभ झाला असल्याचे तीने सांगितले आहे.माझे पालक, आजोबा व गुरुवर्य साईनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने व सर्व शिक्षकवर्ग यांच्या मार्गदर्शनाने हे यश मिळाले असल्याचे सांगत सर्वाचे आभार तीने मानले आहेत.