राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या औचित्यावर राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील विविध सात ठिकाणच्या मंदिराच्या विकासासाठी ५५०३.६९ कोटी रुपयांच्या मंदिर विकास आराखड्यांना मंजुरी
…आणि म्हणूनच आपल्या कर्तुत्ववान लाडक्या नेत्याबद्दल “लोकप्रतिनिधी असावा तर कैसा? आमदार भीमराव केराम जैसा” म्हणत जनता उधळते स्तुतीसुमने
माहूर तालुका प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी
माहूर : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निमाणाच्या कामाला अभिवादन म्हणून राज्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्राच्या विविध सात मंदिराच्या विकासासाठी ५५०३.६९ कोटी रुपयांचे मंदिर विकास आराखड्यास
मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली असून, त्यात राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रसिद्ध तिर्थक्षेत्र माहूरगडच्या विकासासाठी तब्बल ८२९ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.या निर्णयाचे माहूर शहरवासीयांसह लाखों भाविकांनी जोरदार स्वागत केले आहे. यासाठी किनवट- माहूर विधानसभेचे भाजपचे आमदार भीमराव केराम जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू निकटवर्तीय समजले जातात त्यांनी याकामी शासनदरबारी निरंतर केलेल्या पाठपुराव्याला मिळालेले हे मोठे यश असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंती निमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत ५५०३.६९ कोटी रुपयांच्या विविध सात ठिकाणच्या मंदिर विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. ज्यात तिर्थक्षेत्र माहुरच्या विकासासाठी ८२९कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आ.भीमराव केराम यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
केंद्रात नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर आ. भीमराव केराम यांच्या प्रयत्नामुळे तिर्थक्षेत्र माहुरच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याने, गडावर जाण्यासाठी सी.सी.रस्ता, श्री रेणुकामाता मंदीरात दिव्यांग,जेष्ठ नागरिकांना दर्शनाला जाण्यासाठी लिफ्ट व स्कायवॉक, शहरातील राष्ट्रीय महामार्ग,ग्रामीण रुग्णालयासाठी सुसज्ज इमारत, ऑक्सिजन प्लांट, डायलिसिस सेंटर, रुग्णवाहिका, शहरातील सी.सी.रस्ते ईत्यादिसह अन्य महत्त्वपूर्ण ठिकाणी तिर्थक्षेत्र माहूरचा गतिमान विकास झाला असून चौंडी येथील मंत्रीमंडळ बैठकीत तिर्थक्षेत्र माहूरच्या विकासासाठी ८२९कोटींचा विकास निधीला मंजुरी देण्यात आली असल्याने तिर्थक्षेत्र माहूरच्या विकासाचा गाडा आता अधिक गतिमान होणार असून, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.माहूर तिर्थक्षेत्र विकासासाठी ८२९कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला ही बाब निश्चितच माहुर वाशियांसह कोट्यवधी भाविकांसाठी आनंददायी बाब आहे.यामुळे माहूरगडाच्या धार्मिक वैभवात निश्चितच आणखी भर पडेल. मंत्रीमंडळाच्या या निर्णयाचे शहरवासीयांसह लाखों भाविकांकडून स्वागत केले जात आहे.
*आजकालच्या,”गरज सरो अन् वैद्य मरो!” या उक्तीप्रमाणे पाच वर्षानंतर जनता जनार्दनाच्या दारावर जाऊन हात जोडून,वेळी साष्टांग दंडवत घालून विनम्रतेचा खोटा आव आणत चक्क खोटीनाटी आश्वासने देत ‘कामा पुरता मामा’ बनलेल्या नेत्याला जनता दर पाच वर्षांनी केलेल्या कामाचा जाब विचारत असून, “जो विकास काम नहीं करता, उसे दिखाती हैं घर का रस्ता!” अशी सजग भुमिका घेत व सुजाण जनता आता जागृत झाली आहे.त्यामुळेच मागील पाच वर्षात मतदारसंघात केलेल्या विविध भरीव विकास कामांच्या बदल्यात भीमराव केराम यांच्या नावापुढे मतदारांनी सलग दुसऱ्यांदा आमदार पदनाम कोरलेले आहे. आणि म्हणूनच किनवट माहूरचे विकासप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या बाबतीत येथील जनता “लोकप्रतिनिधी असावा तर कैसा? आमदार भीमराव केराम जैसा!” म्हणत आपल्या कर्तुत्ववान लाडक्या नेत्याबद्दल स्तुतीसुमने उधळलत असल्याचे बोलके चित्र मतदारसंघात सर्वत्र पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र शासन,मंत्रिमंडळ निर्णय….
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निमाणाच्या कामाला अभिवादन म्हणून राज्यातील विविध सात ठिकाणच्या मंदिराच्या विकासासाठी ५५०३.६९ कोटी रुपयांचे मंदिर विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली.त्यात..
चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाचे जतन आणि संवर्धन : ६८१.३२ कोटी
अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धारः १४७.८१ कोटी
श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा : १८६५ कोटी
श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखडा : २५९.५९ कोटी
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा: २७५ कोटी
श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा : १४४५.९७ कोटी
श्री क्षेत्र माहुरगड विकास आराखडा : ८२९ कोटी
महाराष्ट्रातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र माहुरच्या विकासासाठी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा केला यासाठी अनेक वेळा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पर्यटन मंत्र्यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री नितिन गडकरीं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी वेळोवेळी माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे नुकतीच पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत तिर्थक्षेत्र माहूरसाठी ८२९कोटींचा भरीव निधी मंजूर केला त्याबद्दल सर्व मंत्रिमहोदयांचे माहूर शहरवासीयांसह लाखों भाविकांकडून आभार मानतो
-आ. भीमराव केराम,किनवट-माहूर विधानसभा