उद्या सकाळी शिवसेनेच्या वतीने माहूरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

माहूर तालुका प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी

माहूर – दि.१० मे: ज्या ज्या वेळी देशाच्या अखंडतेला, अस्मितेला आणि एकोप्याला दुसऱ्याच्या ताटाकडे नजर लावून बसलेल्या हलकट शेजाऱ्याची ‘नापाक’ नजर लागते, त्या त्या वेळी ती नजर शरसंधान साधून चिंधड्या करायची असते

अशीच कसोटीची वेळ सध्या* *आपल्या देशावर येऊन पडली आहे.भारत-पाकिस्तान मध्ये सध्या अघोषित युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या कठीण परिस्थितीत सर्व भारतीयांना एकजूटता दाखवण्याची गरज असून, हम सब एक है चा परिचय करून देण्याची वेळ आली आहे. ‘नापाक’ देश सर्व आंतरराष्ट्रीय युद्ध नियमांना तिलांजली देत भारतातील रहिवासी क्षेत्राला टार्गेट करत प्रचंड प्रमाणात मिसाईल व ड्रोन हल्ले करून निरपराध नागरिकांना, देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना लक्ष्य करू पाहत आहे. भारताचे तिन्ही फ्रंटचे जवान हे हल्ले नेस्तनाबूत करत आहेत. अशा या अटीतटीच्या वेळी एकजुटतेचा संदेश देण्यासाठी ….

 महाराष्ट्राचे शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून तथा जिल्हाप्रमुख विवेक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना माहुर तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांच्या नेतृत्वात.

उद्या रविवार दि.11/05/2025 रोजी सकाळी 09:00 वाजता माहूर शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तरी शिवसेना पक्षातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडीचे, कार्यकर्ते, शाखाप्रमुख, सर्व संघटक या सर्वांनी उपस्थित राहावे असे विनंती वजा आवाहन आयोजक सुदर्शन नाईक, युवानेते शिवसेना तालुकाप्रमुख, माहूर यांनी केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!