स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांची कारवाई दोन दिवसांत गुन्हेगाराकडून वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केलेल्या सहा मोटरसायकली जप्त.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

जिल्हा प्रतिनिधी राहुल कोलते

 नांदेड जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडककीस आणाने बाबद मा. श्री. अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत श्री उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा नांदेड यांना आदेश केले होते.

 आज दिनांक 9/5/2025 रोजी गुप्त माहितीदाराकडून माहिती घेतली असता आरोपी नामे १ विशाल मधुकर डोलारकर वय 27 वर्ष व्यवसाय बेकार रा. लंगडे गल्ली अर्धापूर ता. अर्धापूर जि. नांदेड २ जुबेरखान आमिरखान वय 32 वर्षे व्यवसाय मेकॅनिक रा. मदिनानगर अर्धापूर यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मोटरसायकल चोरी किल्ल्यांची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर सदर आरोपी शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी दोघांनी मिळून वजीराबाद अर्धापूर बारड हद्दीत वेगवेगळ्या कंपनीच्या पाच मोटरसायकल चोरी केले बाबत सांगितले. त्यांच्या ताब्यातून पाच मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत. तसेच एक विधी संघर्ष ग्रस्त बालकाच्या ताब्यातून हद्दीत चोरी केलेली एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.

    अशा वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केलेल्या एकूण सहा मोटरसायकल किंमत 230,000/रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. छापा कार्यवाही करणारे पोलीस अधिकारी व आमदार मा श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड, मा सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड, मा खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर, श्री उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड सदरील कामगिरी करणारे अधिकारी व अंमलदार यांचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!