दुचाकीला हरणाची धडक महिला व युवक गंभीर जखमी, बालाजी गाढे पाटील यांनी दाखवला माणुसकीचा हात

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/राहुल कोलते

नांदेड – मुदखेड तालुक्यातील माळकौठा परिसरात निसर्ग धाब्या जवळ एक दुर्दैवी अपघात घडला एका दुचाकीवरून तिघेजण प्रवास करीत असताना अचानक समोर हरीण येऊन गाडीला धडक दिली या धडकेमुळे दुचाकी वरील प्रवासी एक महिला आणि एक युवक गंभीर जखमी झाले.

     चिलपिंपरी येथील लग्नकार्य आटोपून रोहिपिंपळगाव येथे शाल अंगठीला जात असताना. युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा.बालाजी पाटील गाढे यांना जखमी अवस्थेत प्रवासी पडलेले दिसले असता. त्यांची गाडी साईडला घेऊन त्यानी जखमीना स्वतःच्या गाडीमध्ये बसून माळकौठा येथे डोणगावकर यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. रस्त्यावर जखमी प्रवाशांना पाहून एकानेही गाडी थांबवून त्यांच्याकडे पाहिले सुद्धा नाही किंवा हिंमत पण दाखवली नाही मात्र बालाजी पाटील गाढे यांनी मात्र माणुसकीचा हात म्हणून त्या जखमींना दवाखान्यात नेण्याचं काम त्यांनी केलं. येथे सुविधा अपुरी असल्यामुळे त्या जखमेना तिथून नांदेडला तज्ञ डॉक्टरशी संपर्क साधून, पैसे नंतर बघू अगोदर उपचार करा अस स्पष्ट सांगितलं याप्रसंगी त्यांनी मदतच नाही केली तर माणुसकी काय असते हे समाजापुढे दाखवून दिलं आहे. त्यांच्या कार्याचे परिसरामध्ये खूप कौतुक केले जात आहे.

      मुदखेड तालुक्यातील सर्वच युवक काँग्रेसचे कार्यकर्ते श्याम पाटील शिंदे रोही पिंपळगावकर, संतोष पाटील गाडे, केशव पाटील शिंदे, संभाजी पाटील गाडे, बालाजी पाटील येडे आदींनी माहिती दिली.

Share This Article
error: Content is protected !!