नांदेड जिल्हा प्रतिनिधी/राहुल कोलते
नांदेड – सावता परिषद संस्थापक अध्यक्ष मा कल्याणराव आखाडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीची बैठक १० मे रोजी पार पडली यावेळी प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी प्रधान महासचिव डॉ राजीव काळे प्रदेश उपाध्यक्ष गोरखनाथ राऊत यांच्या उपस्थितित राज्यातील जिल्हा कार्यकारीणी निवडी संदर्भात बैठक संपन्न झाली आहे.
यामधे महाराष्ट्रातील सावता परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदांची निवड जाहीर करण्यात आली. या निवडी मध्ये नांदेड जिल्हाध्यक्षपदी श्री सुनिल शिंदे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली . सुनिल शिंदे यांचा नांदेड जिल्ह्यासह परभणी हिंगोली लातूर जिल्हयात मोठा दांडगा जनसंपर्क असून गेल्या अनेक वर्षापासून संघटनेची धूरा सांभाळली. त्यांनी मागील तीन वर्षापासून जिल्हा उपाध्यक्षपदाची धुरा प्रभावीपणे सांभाळली आहे. संघटनेच्या माध्यमातून माळी समाजाच संघटन मजबूत केले.
गावपातळीवर शाखा स्थापन करून वेगवेगळे आंदोलनात सहभाग घेवून समाजाच्या अडीअडचणी वेळोवेळी सोडवण्याचा प्रयत्न केला . समाजकार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात तसेच संघटनेच्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन माननीय कल्याणराव आखाडे यांनी सुनिल शिंदे यांना मोठी जबाबदारी दिली आहे त्यांच्या या निवडीबद्दल नांदेड जिल्ह्यातील समाज बांधवांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.