ठिबक,तुषार असोसिएशन नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी साईनाथ पाटील जाधव रोशनगावकर यांची निवड

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड दिनांक 08/05/25 नांदेड येथे झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा अध्यक्ष पदासाठी साईनाथ पाटील जाधव रोशनगावकर आणि जिल्हा उपाध्यक्ष म्हणून संदीप देशमुख कामनगांवकर व सचिव म्हणून बळवंत पाटील गाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

    यावेळी उपस्थित मान्यवर ज्येष्ठ वितरक सुपारे साहेब, शिंदे पाटील तळेगावकर,बोधने पाटील नरसीकर, मोहन पाटील जाधव मुखेडकर,गजु पाटील अर्धापूरकर,साईनाथ कदम चोळाखेकर,एम डी पवार निवघेकर,पंढरी शिंदे रावधानोरकर, संजय पाटील घोणसे, गजानन कुंटेवाड आलुर धर्माबाद इत्यादी यांची उपस्थिती होती.

    गेल्या दोन वर्षांपासून ठिबक, तुषार अनुदान वेळेवर न मिळाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत त्यामुळे शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी डिलर असोसिएशन गरजेचे होते,

      बर्याच दिवसांपासून नांदेड जिल्हा असोसिएशन समिती स्थापन करण्याची चर्चा सुरू होती,मारोती पवार निवघेकर यांनी साईनाथ पाटील जाधव रोशनगावकर यांचे नाव सुचविले होते खुप लोकांनी पाठिंबा दाखवला होता तेव्हा धर्माबाद येथील प्रतिष्ठित व्यापारी साईनाथ पाटील कदम चोळाखेकर यांनी डिलर मिटिंग आयोजित केली व सर्व डिलर्सना एकत्र करून हा निर्णय घेण्यात आला.

    जिल्हा अध्यक्ष पदासाठी निवड झाल्यानंतर साईनाथ पाटील जाधव यांनी सर्व डिलर्सचे आभार मानले व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व वितरक आणि साईनाथ कदम चोळाखेकर व मारोती पवार निवघेकर यांनी परिश्रम घेतले .या निवडीबद्दल नांदेड जिल्ह्यातून धर्माबाद तालुक्यातून सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share This Article
error: Content is protected !!