नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव : तालुक्यातील मौजे हुस्सा येथील लोकशाहीर साहित्य सम्राट सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती निमित्त मान्यवरांचा सन्मान सोहळा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा घेण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नायगाव विधानसभेतील लाडक्या नेत्या व माजी जिल्हा परिषद सदस्य सौ पूनम ताई राजाजी पवार व कुंटूर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब यांच्या शुभहस्ते हुस्सा येथील जिल्हा परिषद शाळेतील उत्कृष्ट व स्पर्धक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला होता. डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे अवचिते साधून जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना वही व पेन व स्पर्धक विद्यार्थ्यांना ट्रॉफी वही पेन असे देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे ध्वजारोहण माननीय सौ पूनम ताई राजेशजी पवार व सरपंच प्रतिनिधी रमेश रामराव माली पाटील आणि कुंटूर पोलीस स्टेशनचे पीआय साहेब यांच्या शुभ हस्ते सकाळी 9 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माननीय सौ पूनम ताई राजेश पवार हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुंटूर पोलीस स्टेशनचे पीआय साहेब माननीय कुसमे साहेब हे होते तर त्या कार्यक्रमाला उपस्थित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सौ टोकलवार मॅडम, बीट जमादार श्री निकम साहेब, माननीय श्री नारे सर जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक, श्री बंडेवार सर सहशिक्षक हूस्सा,बाबासाहेब पाटील हंबर्डे, रमेशराव रामराव माली पाटील, रामदास दशरथ पाटील, रावसाहेब किशनराव पाटील शिंदे, उमराव पाटील हंबर्डे, व गावातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना सौ पूनम ताई पवार जी असे म्हणाले की, ज्या महापुरुषांनी समाजाच्या जीवन उद्धाराकरिता अहोरात्र जीवन झिजवली अशा महापुरुषांना एका विशिष्ट जातीमध्ये अडकून न ठेवता ते सबंध जाती धर्मासाठी कार्य केले असून त्यांना जातीपुरते मर्यादित कोणीही ठेवू नये कादंबऱ्या हे जगप्रसिद्ध झाले असून त्यांची जगातील विविध देशांमध्ये दखल घेतली आहे हे परिवर्तनवादी विचार असून त्यांच्या विचाराने व लेखनाने समाजात बदल घडून आल्याचे सांगितले आहे. अशा महापुरुषांच्या जयंतीनिमित्त समाजाने एकत्र येऊन जयंती साजरी करणे ही सबंध मानव जातीची गरज असं आहे. जे काही गावातील व समाजातील विकासात्मक विषय असतील तर विषयाला आम्ही करण्यात कटिबद्ध आहोत. तर पुढे कुंटूर पोलीस स्टेशनचे पीआय साहेब असे म्हणाले की विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करून आई-वडिलांचे भवितव्य उज्वल करावे या छोटूशा बालकांच्या गुणगौरव सोहळा आमच्या हस्ते झाला याचे आम्हाला अभिमान आहे. अशा महापुरुषांच्या जयंती आमच्या वाटेला येणे ही आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी तिजोरी आहे असेही श्री कुसमे साहेब म्हणाले आहे. पुढे जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक माननीय श्री बंडेवार सर असे म्हणाले की शाळेतील विद्यार्थी ही आमची श्रीमंती असून असे त्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण शैक्षणिक विकास होणे म्हणजे आमच्या जीवाचे कल्याण झाल्यासारखे आहे. जर विद्यार्थी जीवनात अमुलाग्रह बदल घडवून असेल तर विद्यार्थ्यांनी शिक्षणात अधिक लक्ष घालावे आणि नुसतीच जयंती साजरी करून चालणार नाही ही त्यांचे विचार जोपर्यंत आपण स्वीकारून त्यांच्या विचारांशी व त्यांना आदर्श ठेवून जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हाच आपल्या जयंती साजरी झाल्याचे दिसून येतो आहे. पुढे या कार्यक्रमाचे अध्यक्ष समारंभ माननीय श्री सरपंच प्रतिनिधी श्री रमेशराव रामराव माली पाटील यांनी केले तर या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री नागेश वाघमारे यांनी केले आहे तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अशोक वाघमारे यांनी केले असून या कार्यक्रमाचे आभार श्री सुदर्शन वाघमारे यांनी केले आहे तर या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य श्री शिवाजी वाघमारे, महादेव तुकाराम वाघमारे, सुरेश भाऊराव वाघमारे, अशोक रामजी वाघमारे, जयवंत इरबा वाघमारे, किशोर कामाजी वाघमारे, चंद्रकांत गोविंद वाघमारे दत्ता गोविंद वाघमारे, आनंदा तुकाराम वाघमारे, परमेश्वर वाघमारे राजेश वाघमारे गोविंद वाघमारे श्रीराम वाघमारे जयराम वाघमारे श्रीहरी वाघमारे प्रल्हाद वाघमारे प्रकाश वाघमारे दत्ता लक्ष्मण वाघमारे शिवाजी वाघमारे, गंगाधर वाघमारे केशव वाघमारे अदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हुस्सा येथे विविध उपक्रमाने लोकशाहीर सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरीकरण्यात आली….