विशेष जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
उदगिर – दोन राज्याच्या सीमेवरील सर्वात मोठी बाजार पेठ असलेल्या उदगीर शहराच्या विकास मध्ये माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या दूरदृष्टीने भर पडत असताना स्थानिक व्यापारी यांच्या कडून त्यांनी रस्त्यावर ठेवलेले फलक व वाहाना मुळे प्रवाशी लोकाना त्रास सहन करावे लागत आहे.
तसेच शहरातील भाजी पाला,फळ विक्रेते हातगाड्यांची बेशिस्तरांगा या कडे नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाचे अर्थ पूर्ण दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.उदगीर शहरातील अग्नी शामक दल ते उद्योग भवन या मुख्य मार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडवर अनधिकृत अतिक्रमणाने रस्ते व्यापले असून त्यामुळे वाहनचालक, पादचारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
विशेषतः छत्रपती शाहू महाराज चौक,दुधिया हनुमान मंदिर परिसर व बसस्थानकासमोर,जळकोट रोड परेंत हे अतिक्रमण अधिक तीव्र आहे.या भागात वाहतूक कोंडी,अपघाताचा धोका आणि सार्वजनिक जागेच्या वापरात अडथळे निर्माण झाले आहेत.
या मार्गावर हातगाड्या, फळविक्रेते,चहाच्या टपऱ्या, भाजीपाला विक्रेते,अशा प्रकारचे अनधिकृत व्यवसाय उभे राहिले आहेत.स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार,या व्यावसायिकां कडून दररोज दहा रुपये ‘कर’ स्वरूपात वसूल केला जातो.लाखो रुपये भाडे देवून दुकानदार व्यवसाय करताना धक्कादायक म्हणजे,समोरील जागा मोकळी ठेवणाऱ्या काही दुकान मालकांकडून दररोज 300 ते 400 रुपये भाडे घेण्यात येत असल्याचीही चर्चा आहे.
शहरातील वाहतूक आणि सुरक्षिततेवर परिणाम शाळा,कॉलेज,कार्यालये आणि बाजारपेठ यामुळे या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.सकाळी व संध्याकाळी येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी दिसून येते.पादचाऱ्यांना रस्त्याच्या मधोमधून चालावे लागत असल्यामुळे अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. यात पाणीपुरी,चायनीज, आईस्क्रीम,नारळपाणी,रस्त्यावरील चहाटपऱ्या(धूम्रपान सेंटर),चे हात गाडे व दुचाकीस्वार पेक्षा आटोरिक्षा, काळीपिवळी धारकांची वाहनेअर्ध्या रस्त्यातच तासंतास उभे करून असतात त्यामुळे आणखी गोंधळाची स्थिती निर्माण होते.
प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिक नाराज अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी नगरपरिषदेवर असतानाही,आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.यावरून प्रशासनाकडून उघडपणे अर्थ पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून,अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, प्रशासन ठेकेदारासारखे दर वसूल करणाऱ्यांवर कारवाई का करत नाही? रस्त्यानी चालत फिरणाऱ्या व्यक्तिने सांगितले की, “हे सगळं वर्षानुवर्षं चालू आहे.अधिकारी येतात,पाहतात,पण कोणताही ठोस निर्णय घेत नाहीत.बहुतेक वेळा ही अतिक्रमणं राजकीय किंवा स्थानिक दबावाखाली वाचवली जातात.”
नगरपरिषदेची प्रतिक्रिया अद्याप अनुत्तरित या प्रप्रांतीय अतिक्रमणा संदर्भात नगरपरिषद किंवा प्रभाग अधिकारी यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र या विषयाकडे प्रशासन गांभीर्याने पाहिले नाही तर नागरिकांचा संयम सुटेल आणि आंदोलनात्मक पावले उचलली जातील,अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत.सामान्य जनतेनं त्रास होणार नाही,नाल्यावरील व सर्विस रोड मोकळे झाले तर उदगिरचे वाहतुक सुरळीत होईल असे जानकरांचे म्हणणे आहे.