गुंडवळ येथे भगवान गौतम बुद्ध यांची २५६९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी; 

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 माहूर :-प्रतिनिधी पंडित धुप्पे

 माहूर तालुक्यातील अति दुर्गम आणि डोंगराळ भागात असलेल्या मौजे गुंडवळ येथील आदिवासी,बंजारा अठरा पगड जातीच्या बहुल व धार्मिकदृष्ट्या संवेदनशील गावाने आज पुन्हा एकदा सामूहिक ऐक्य, श्रद्धा आणि सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवत खीरदान व तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५६९ वी जयंतीचा उत्सव अतिशय उत्साहात,भक्तिभावाने आणि सामाजिक बांधिलकीने साजरा.करण्यात आला,सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड, डॉ, झनक मानकर, मनोज कीर्तने, केशव भगत, रेणुकादासजी वानखेडे, महेंद्र घाळवट, दाऊसिंग जाधव सर, नीलकंठ मस्के, रामसिंग पवार नायक, धर्मा राठोड, उत्तम राठोड, शंकर जाधव, विजयसिंग ठाकूर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

      कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सामूहिक वंदनेने वातावरण भारावून गेले होते. या प्रसंगी सर्व उपस्थितांनी शांतता, सहिष्णुता आणि करुणा यांचे प्रतीक असलेल्या खीरदान उपक्रमात सहभागी होत श्रद्धेचे दर्शन घडवले. खीरदान हा बुद्ध जयंतीच्या निमित्ताने करण्यात आलेला एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम असून, या माध्यमातून बौद्ध धम्मातील दातृत्व व समता या मूल्यांचे पुनरुच्चारण झाले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम जमदाडे, रमेश कांबळे, सतीश खंदारे, महेश पाईकराव, आदींनी सहकार्य केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल कांबळे यांनी केले तर आभार राजु कांबळे यांनी व्यक्त केले,

Share This Article
error: Content is protected !!