जप्त वाळू साठ्यातून वाळू उपलब्ध करून देणार ,सहाय्यक जिल्हाधिकारी झेनिथ चंद्र दोंथूलां यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी/

श्रीक्षेत्र माहूर – शहरासह तालुक्यातील हजारो घरकुल लाभार्थ्यासह वैयक्तिक बांधकाम करणाऱ्या नागरिकांना गेल्या दोन महिन्यापासून वाळू उपलब्ध नसल्याने बांधकाम रखडले असून पावसाळा तोंडावर आल्याने तसेच हजारो कामगारावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याने माहूर शहरातील शिष्टमंडळाने माहूर येथे आलेल्या सहाय्यक जिल्हाधिकारी जझे नीथ चंद्र दोंथूलां यांची भेट घेतली असता त्यांनी जप्त केलेल्या वाळू साठ्यातून नागरिकांना येत्या दोन ते तीन दिवसात वाळू उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी तहसीलदार किशोर यादव नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड नायब तहसीलदार कैलास जेठे यांचे सह मान्यवरांची उपस्थिती होती

     गेल्या दोन महिन्यापासून माहूर तालुक्यातील बांधकामे वाळून नसल्याने बंद असून पंचायत समितीकडून गतवर्षीची घरकुल आणि यावर्षीची वाटण्यात आलेली सात हजारावर घरकुले तसेच माहूर शहरातील दीड ते दोन हजार घरकुलाची कामे वाळू नसल्याने ठप्प असून घरकुल लाभधारक पावसाळा तोंडावर आल्याने घाबरलेल्या अवस्थेत असून प्रचंड महाग असलेली पिवळी वाळू घेणे शक्य नसल्याने शासनाकडून मोफत वाळू आणण्यासाठीही तीन ते चार हजार रुपये खर्च येत असल्याने घरकुलधारक त्रस्त तर इतर वैयक्तिक बांधकाम करणारे नागरिक ही वाळूपाई उघड्यावर असल्यासारखेच आहेत त्यामुळे माहूर शहरातील काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद तूपदाळे पत्रकार जयकुमार अडकिने पत्रकार बावाणी पत्रकार राज ठाकूर सामाजिक कार्यकर्ते तथा व्यवसायिक जितू चोले तसेच लांजि चे सरपंच तथा माजी पंचायत समितीचे सभापती मारुती रेकुलवार यांचे सह मान्यवरांनी माहूर येथे आलेले सहाय्यक जिल्हाधिकारी झेनिथ चंद्र दोंथूलां यांची भेट घेऊन निवेदन दिले असता त्यांनी तालुक्यात अनेक ठिकाणी जप्त केलेली 419 जप्त वाळू साठ्यातून दोन ते तीन दिवसात वाळू विक्रीची परवानगी देणार देणार असल्याचे आश्वासन दिले

      सहाय्यक जिल्हाधिकारीचे झेनीथ चंद्र दोंथूलां यांनी दोन ते तीन दिवसात जप्त वाळू साठ्यातून नागरिकांना वाळू उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिल्याने उपस्थित मान्यवरांनी त्यांचे आभार मानले

Share This Article
error: Content is protected !!