हिमायतनगर तहसीलदार यांच्या ढिम्या कामामुळे आली शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ…..

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

हिमायतनगर ता.प्रतिनिधी – बाबाराव जरगेवाड

हिमायतनगर – तहसीलदार यांच्या ढिसाळ कारभारामुळे सिरंजनी येथील शेतकऱ्यांवर आली आत्महत्या करण्याची वेळ , सिरंजनी येथील रहिवासी असलेले शेतकरी तुकाराम लक्ष्मण सुरोशे यांच्या शेत जमीन ही मौजे बोरगडी येथील शिवारात असून त्यांनी त्यांच्या नातीच्या लग्न साठी व‌ स्वःताला पँऱ्यालीस झाल्याने हातबल होउण,खाजगी कर्ज काढले आहे.त्याच कर्जाची परतफेड होत नसल्याने त्यांनी आपल्या ताब्यातील काही जमीन विकण्याचा निर्णय घेतला आहे.

     परंतु जमीन विक्री करत असतांनाच सदरील जमीनीच्या सातबारा हा माननीय तहसिलदार यांचेकडे 155 नुसार सातबारा दुरुस्ती साठी अर्ज केला. परंतु माननीय हिमायतनगर येथील तहसिलदार यांनी मागील एका वर्षा पैक्षा जास्त चा कालावधी जाऊण पण त्यात कोठलाही आदेश अद्याप काढलेला नाही व तसेच संबंधित शेतकरी यांनी अनेक वेळा तहसिलदार यांचेकडे पाठपुरावा केला परंतु माननीय तहसिलदार यांनी फक्त त्यांना तारीख पे तारीख देण्याचा विडा उचलला असल्याचं दिसत आहे.

      अर्जदार यांनी तहसिलदार यांचेकडे पाठपुरावा करून सातबारा दूरूस्ती चे काय झाले हि विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांना जवळपास तिन तास वेटींग ला ऊभे करूण पण नंतर भेट दिली नाही.सदरील सातबारा दूरूस्ती लवकर नाही झाल्यास मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशी प्रतिक्रिया लोकतंत्र न्यूज शी बोलतांना अर्जदार तूकाराम सूरोशे यांनी व्यक्त केली आहे.

Share This Article
error: Content is protected !!