माहूरसह इतर देवस्थान विकास आराखड्याचा निर्णय अभिनंदनीय!- खा. अशोक चव्हाण

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड,प्रति हरजिंदर सिंघ संधू

नांदेड – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निर्माणाच्या कार्याला अभिवादन म्हणून भाजप महायुतीच्या राज्य सरकारने श्री क्षेत्र माहूरगड विकास आराखड्यासाठी ८२९ कोटी रुपयांसह विविध देवस्थानांच्या एकूण ५,५०३.६९ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिल्याबद्दल खा. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण भाजप महायुती सरकारचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.

     याबाबत समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, चौंडी, जि. अहिल्यानगर येथे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाचे जतन आणि संवर्धनासाठी ६८१.३२ कोटी, अष्टविनायक गणपती मंदिरांच्या जिर्णोद्धारासाठी १४७.८१ कोटी रुपये, श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यासाठी १८६५ कोटी रुपये, श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी २५९.५९ कोटी रुपये, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखड्यासाठी २७५ कोटी रुपये, श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्यासाठी १४४५.९७ कोटी रुपये तर श्री क्षेत्र माहूरगड विकास आराखड्यासाठी ८२९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निर्णयासाठी मी मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व संपूर्ण भाजप महायुती सरकारचे अभिनंदन करतो व आभार मानतो.

Share This Article
error: Content is protected !!